शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पेसा अंतर्गत गावांच्या हिशेबाचा पत्ताच नाही, ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 01:44 IST

मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही.

पालघर - मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. यानिषेधार्थ ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केला.तालुक्यातील मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत बंदाठे, झांझरोली आणि रोठे ही तीन पेसा गावे आहेत. बंदाठे ग्रामसभा अध्यक्ष म्हणून संजय रिंजड तर झांझरोली ग्रामसभा अध्यक्ष म्हणून वरखंडे या महिलेची निवड झाली आहे. मागील आर्थिक वर्षात झालेल्या सभेत सरपंच करुणा पाटील आणि ग्रामसेवकाने मागील पेसा निधीचा जमाखर्च आमच्याजवळ सादर केलेला नाही. ३१ मार्च २०१९ ला आर्थिक वर्ष संपल्यानंतरही आजतागायत पेसाच्या निधीचा जमाखर्च आम्हाला दिला नसल्याने ही आदिवासी समाजाची घोर फसवणूक असल्याचे तक्र ारदार संजय रिंजड यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने आम्हाला दिलेल्या पेसाच्या अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवण्याचा डाव असल्याचेही तक्रारदाराने तक्रारीत नमूद केले आहे. सरपंचांवर ग्रामपंचायत अधिनियम ३२(१) खाली मंत्रालयात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र सरपंच सत्ताधारी पक्षामध्ये असल्याने राजकीय दडपण आणून त्या तक्र ारीची सुनावणी प्रलंबित ठेवत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार चालत असल्याने आमच्या गावचा विकास खुंटला असून दुसरीकडे मात्र अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायत अभय देत आहे. आमच्या पेसा कार्यक्षेत्रात ग्रामपंचायतीला कुठलाच अधिकार नसताना अनधिकृत चाळी, इमारत बांधकाम परवानगी कोणाकडून दिल्या गेल्या आहेत, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पेसा अंतर्गत गावांमध्ये सुरू असलेली सर्व अनधिकृत कामे बंद करून पेसा ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कुठलीच बांधकामे आम्ही आता सुरू ठेवू देणार नाही, असेही उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.घरकूल योजना आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत आलेल्या शौचालयाच्या यादीमध्ये देखील घोळ असून त्याची माहिती देखील पेसा ग्रामसभेला दिली जात नाही. १४ व्या वित्त आयोग निधी खर्चाच्या बाबत अनियमतिता झाल्याचे निदर्शनास आले असून त्यासाठी सरपंच तसेच ग्रामसेवकांनी १ लाख ३० हजारांचा दंडही भरल्याचे सरपंचांनी ‘लोकमत’शी बोलताना मान्य केले आहे. मात्र अन्य आरोपांमध्ये कुठल्याही प्रकारची तथ्यता नसल्याने पंचायत समिती, जिल्हापरिषद आणि आयुक्त कोकणभवन यांनी मला क्लीनचिट दिल्याचे सरपंच करुणा पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शासन पातळीवरून आमच्यावर अन्याय केला जात असल्याने तसेच मायखोप ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. याप्रकरणी आपण उपसरपंच चेतन गावड आणि अन्य लोकांविरोधात सफाळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले.या ग्रामपंचायतीचा मी पाचवा ग्रामसेवक असून प्रत्येक ग्रामसभेत हा विषय चर्चेला असतो. सन २०१५-१६, १६-१७,१७-१८ सालचा जमाखर्च सादर केला जातो, मात्र तो अमान्य केला जातो.- टी बी.भुजबळ,ग्रामसेवक, मायखोप

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतVasai Virarवसई विरार