विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अणे यांना पाठिंबा

By Admin | Updated: March 27, 2016 00:38 IST2016-03-27T00:38:06+5:302016-03-27T00:38:06+5:30

अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी घेतलेल्या वेगळ्या राज्याच्या भूमिकेला विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाठिंबा दर्शविला आहे.

Vidarbha State Movement Committee's support to Aane | विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अणे यांना पाठिंबा

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अणे यांना पाठिंबा

विदर्भवाद्यांची बैठक : विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्यांचा निषेध
चंद्रपूर : अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी घेतलेल्या वेगळ्या राज्याच्या भूमिकेला विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाठिंबा दर्शविला आहे.
अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशाचे वेगळे राज्य व्हावे, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली. अ‍ॅड. श्रीहरी अणे हे विदर्भवादी आहेत आणि सरकारला हे माहिती होते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या विदर्भाची किंवा मराठवाड्याची बाजू घेतली. यात त्यांनी काहीही चूक केली नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून गेल्या ५६ वर्षात राज्यकर्त्यांनी विदर्भ व मराठवाड्याकडे सतत दुर्लक्ष केले. त्यांना उपेक्षित ठेवले. नागपूर कराराचे पालन केले नाही. म्हणून वेगळा विदर्भ किंवा वेगळा मराठवाडा राज्य द्या, अशा मागण्या होत आहेत. विदर्भाची मागणी तर १०९ वर्षे जुनी आहे. सर्वच्या सर्व आयोग आणि कमिट्यांनी वेगळ्या विदर्भाचे समर्थन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली. एवढेच नाही तर महाराष्ट्राचे चार राज्य करावे ही सूचना केली. आरएसएसची हिच भूमिका असताना वेगळा विदर्भ कां दिला जात नाही? हा विदर्भवाद्यांचा प्रश्न आहे. अ‍ॅड. श्रीहरी अणे ही भूमिका मांडत होते. त्याबद्दल भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. पर्यायाने त्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला. त्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध करून अ‍ॅड.अणे यांना पाठिंबा दिला आहे. आता अ‍ॅड.अणे वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनात भाग घेतील आणि विदर्भ राज्याचे आंदोलन बळकट होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीला किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, प्रा.एस.टी. चिकटे, शेख मैकू शहाबुद्दीन, डी.के. आरीकर, प्रा.माधव गुरनुले, अरुण धानोरकर, सूर्यभान झाडे, अनवर आलम मिर्झा, यशोधरा पोतनवार, सोमेश्वर येलचलवार, मितीन भागवत, अंकुश वाघमारे, जहीभाई काझी, पांडुरंग गावतुरे, नथमल सोनी, दिवाकर पेंदाम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha State Movement Committee's support to Aane