वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे लसीकरण इतरांचे मनोधैर्य वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:28+5:302021-01-22T04:26:28+5:30

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...

Vaccination of senior health officials will boost the morale of others | वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे लसीकरण इतरांचे मनोधैर्य वाढविणार

वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे लसीकरण इतरांचे मनोधैर्य वाढविणार

Next

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी बुधवारी कोविशिल्ड लस घेतली. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी गेडाम आदींसह महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. प्रवीण पंत, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल माडुलवार, डॉ. वासुदेव गाडेघोणे हेदेखील कोविशिल्ड लस घेणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील १६ हजार ५४२ कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीसाठी नोंदणी करण्यात आली. प्राप्त लस साठ्यातून सध्या नऊ हजार आरोग्य सेवकांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या अनुषंगाने १६ जानेवारी रोजी लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. हे लसीकरण मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार असे प्रत्येक आठवड्यातून चार दिवस करण्यात येणार आहे. आतापर्यंत तीन सत्रात लसीकरणात आरोग्य सेवेतील एकूण ११६२ कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली आहे.

Web Title: Vaccination of senior health officials will boost the morale of others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.