शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
2
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी DCM एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनतेचा प्रचंड प्रतिसाद!
4
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
5
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
6
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
7
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
8
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
9
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
10
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
11
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
12
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
13
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
14
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
15
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
16
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
17
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
18
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
19
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
20
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता पानफळीवर बाल कामगारांचा वापर

By admin | Updated: May 26, 2016 02:02 IST

सध्या सुरू असलेल्या तेंदूपत्ता हंगामादरम्यान पान फळीवर तेंदूपत्ता पुडके पलटविण्यासाठी बाल कामगारांचा वापर करण्यात येत आहे.

धाबा येथील प्रकार : ठेकेदारावर कारवाईची मागणीगोंडपिपरी : सध्या सुरू असलेल्या तेंदूपत्ता हंगामादरम्यान पान फळीवर तेंदूपत्ता पुडके पलटविण्यासाठी बाल कामगारांचा वापर करण्यात येत आहे. अल्प दरात बालगोपालांकडून कामे करुन घेत कंत्राटदारांक़डून बालकामगार संरक्षण कायद्याचा भंग होत असल्याचे तालुक्यातील धाबा युनिटच्या पानफळीवर दिसून आले. उन्हाळा ऋतूचे आगमन होताच ग्रामीण भागातील नागरिकांना तेंदूपत्ता संकलनाचे वेध लागते. प्रहरी पासूनच रानावनात जाऊन तेंदूपाने तोड करुन घरी सहकुटुंब त्याचे पुडके बांधण्याच्या कामी लागल्याचे चित्र आज खेड्यापाड्यात दिसून येते. तत्पूर्वी वनविभागाकडून तेंदूपत्ता संकलनाचा कंत्राट मिळविणारे कंत्राटदार यांचेही तालुक्यात आगमन होते. दरवर्षी चालणाऱ्या या हंगामी उद्योगात ग्रामीण भागातील अनेक कुटुंब व्यस्त असतात. अशातच कंत्राटदार हे तेंदूपत्ता संकलनातून विक्रीस आणलेले पुडके नागरिकांकडून फळीवर (ठिय्या) येथे खरेदी करतात. ओलसर तेंदूपत्यांना वाळवून बिडी व अन्न उद्योगाकरिता याची वाहतूक परराज्यात केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मौजा धाबा येथील युनिट कंत्राटदाराच्या वतीने संकलित तेंदूपत्ता पुडके वाळविण्यासाठी व पलटविण्यासाठी धाबा नाल्यानजीकच्या फळीवर बाल कामगारांचा वापर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता तेंदूपत्ता फळीवर पुडके पलटविण्यासाठी उन्हाळा ऋतूत शाळेला सुट्टी असलेले बालगोपाल यांना ५ ते १० रुपयांचे प्रलोभन देऊन त्यांच्यामार्फत ही कामे करवून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाली. एकीकडे शासनाने सर्वशिक्षा अभियान, सक्तीचे शिक्षण, सर्वांना शिक्षणाचा अधिकार आधी योजनांतून कोट्यवधीचा खर्च करुन कोणताही बालक शाळाबाह्य राहू नये तसेच राज्यात व देशात बाल कामगारांचा वापर करणे, यासाठी स्वतंत्र कायदा केला असताना परराज्यातून येणाऱ्या या तेंदूपत्ता हंगामी कंत्राटदारांकडून शासन नियम पायदळी तुडविल्या जात आहे.सध्या जिल्ह्याचे तापमान ४६ अंशापर्यंत पोहोचले असून रखरखत््या उन्हात केवळ पाच ते १० रुपयांचे प्रलोभन देऊन धाबा युनिट कंत्राटदाराकडून बाल कामगारांचा सर्रास वापर केला जात आहे. चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर बाल कामगार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)