शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

‘लोकमत रक्ताचं नातं’ लोगोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 5:00 AM

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. अशा समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव अवश्य वाचणार आहे. - विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा.

ठळक मुद्दे२ जुलैपासून रक्तदान महायज्ञ : रक्तदान करून जीव वाचविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेला प्रारंभ होत आहे. या कालावधीत संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचा महायज्ञ होत आहे. चंद्रपूरात या मोहिमेच्या लोगोचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गहलोत, रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनंत हजारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. अविनाश टेकाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाभरातील रक्तदाते व विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रक्ताची रुग्णांना सातत्याने गरज भासत आहे. रक्त हे कोणत्याही कंपनीत उत्पादीत होत नसल्याने रक्तदानाशिवाय रक्तसंकलन होणे शक्य नाही. कोरोनाकाळात रक्तदान शिबिरांवरही परिणाम झाल्यामुळे रक्ताची कमतरता जाणवायला लागली आहे. आता ती कमतरता भरुन काढण्यासाठी अशा रक्तदान मोहिमेची गरज आहे. ‘लोकमत’च्या स्तुत्य उपक्रमात सर्वांनी ‘हेच कार्य महान’ ही भूमिका निभवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, आभार लोकमतचे चंद्रपूर शाखा व्यवस्थापक विनोद बुले व लोकमत सखी मंच संयोजिका सोनम मडावी यांनी केले.

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम जिल्हाभरात राबविला जाणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे. या बिकट स्थितीत रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत आहे. अशा समयी ‘लोकमत’ने हाती घेतलेला ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव अवश्य वाचणार आहे.- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर जिल्हा. 

लोकमतच्या या उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन ‘लोकमत’ने या उपक्रमात रक्ताचं नातं जोपासण्याचा ध्यास घेतला आहे. आपणही रक्तदान करून कुणाचा तरी जीव वाचवून रक्ताचं नातं तयार करू शकतो. ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अतिशय मौल्यवान उपक्रम आहे.- संध्या गुरुनुले, अध्यक्ष, जि.प. चंद्रपूर. 

सध्या महाराष्ट्राला रक्ताची गरज आहे. यासोबतच जिल्ह्यातही दररोज सरासरी ५० बाॅटल रक्ताची गरज कुणाला तरी वाचिवण्यासाठी भासत आहे. रक्ताची मागणी वाढते आहे. मात्र रक्ताचा अपेक्षित पुरवठा होण्यास अडचण होत आहे. रक्तदानातूनच ही गरज पूर्ण करता येणे शक्य आहे. लोकमतने हाती घेतलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अमुल्य अशा उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे. ही काळाचीही गरज आहे.- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर. 

टॅग्स :LokmatलोकमतBlood Bankरक्तपेढी