शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात रोगाने कपाशीची पिके करपली

By admin | Updated: September 10, 2014 23:32 IST

राजुरा तालुक्यातील नदीपट्टा भागातील चार्ली, निर्ली, साखरी, धिडसी, कढोली, पोवनी, बाबापूर परिसरातील पिके अज्ञात रोगाने करपली असून कपाशीसोबतच तुर पिकालाही फटका बसत असल्याने शेतकरी

सास्ती : राजुरा तालुक्यातील नदीपट्टा भागातील चार्ली, निर्ली, साखरी, धिडसी, कढोली, पोवनी, बाबापूर परिसरातील पिके अज्ञात रोगाने करपली असून कपाशीसोबतच तुर पिकालाही फटका बसत असल्याने शेतकरी एका नव्याच संकटात सापडला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी जरा सुखावला असला तरी जास्त प्रमाणात पाऊस आल्याने परिसरातील कपाशीची पिके करपण्याच्या मार्गावर आहे. झाडाच्या बुंध्यापासून झाड करपत असून पूर्णपणे सुकत आहे. शेतातील शेकडो झाडे करपली असून शेतकऱ्यांचे चांगली हाती येणारे पीक हातून जाण्याची वेळ आली आहे.शेतकऱ्यांनी पावसाअभावी पिकाची पेरणी केली. दुबार- तिबार पेरणी करावी लागल्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला. त्यात निसर्गाने कृपा दाखवीत अधून-मधून पाऊसही पाडला. शेतकऱ्यांनी मेहनत करुन कपाशीचे पीक चांगल्या पद्धतीने जोपासले. परंतु चांगल्या पिकावर दृष्ट लागावी तशी स्थिती झाली आहे. मात्र मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांवर रोगाची लागण होणे सुरू झाले आहे. अज्ञात रोगाने पिके करपली जात आहे. झाडाच्या बुंध्यापासून झाड करपत आहे. अनेक शेतककऱ्यांच्या शेतात अशीच परिस्थिती दिसून येत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असूनही तालुक्यात कृषी विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांना कोणतहीे मार्गदर्शनही नाही. त्यामुळे शेतकरी बांधव कृषी विभागावर अत्यंत नाराजी व्यक्त करीत आहे. (वार्ताहर)