अल्पवधीत बंधाऱ्याला पडल्या भेगा

By Admin | Updated: April 30, 2015 01:27 IST2015-04-30T01:27:23+5:302015-04-30T01:27:23+5:30

शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी शासनाने बंधाऱ्याची योजना सुरू केली.

The underprivileged has broken down | अल्पवधीत बंधाऱ्याला पडल्या भेगा

अल्पवधीत बंधाऱ्याला पडल्या भेगा

चंद्रपूर : शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी शासनाने बंधाऱ्याची योजना सुरू केली. मात्र, मलिदा लाटण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधून कंत्राटदार मोकळे झाले. परिणामी अल्पवधीतच बंधाऱ्याला भेगा पडल्या आहे. या बांधकामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी मालपिरंजी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
मूल तालुक्यातील मालपिरंजी या गावात २०१४-१५ या वर्षात बंधाऱ्याचे काम मंजूर झाले. चेकपिरंजी गट ग्रामपंचायत मालपिरंजी येथे बंधारा बांधकामासाठी शासनाकडून पाच लाखांचा निधी मिळाला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या बंधाऱ्याचे काम शासनाच्या नियमानुसार करण्याची आवश्यकता होती. मात्र, यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला.
निकृष्ट दर्जाच्या बंधाऱ्याचे काम करण्यात आले. यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पिकाला पाणी मिळण्यास अडचण होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The underprivileged has broken down