शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जडवाहतुकीचे आणखी दोन बळी

By admin | Updated: April 26, 2015 01:45 IST

गडचांदुरात अपघाताची मालिका सुरूच असून माणिकगड सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज शनिवारी झालेल्या आणखी एका अपघातात...

गडचांदूर : गडचांदुरात अपघाताची मालिका सुरूच असून माणिकगड सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आज शनिवारी झालेल्या आणखी एका अपघातात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताच्या नातेवाईकांना मोबदला देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. जडवाहतूक व वाहनांच्या वाट्टेल तिथे होणाऱ्या पार्र्कींगमुळे आणखी किती जणाचे बळी जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नंदकिशोर नारायण आत्राम (२७) रा. चंदनवाही व सुनील यादव केळझळकर (२६) रा. पिंपळगाव अशी मृतांची नावे आहेत. सुनिल केळझळकर हा येथील एका वाहन दुरुस्तीच्या दुकानात काम करतो. दुकानाची चावी आणण्याकरिता मालकाच्या घरी दुचाकीने (एम.एच.३४ एक्स ४०३९) निघाला. माणिकगड कंपनीच्या रस्त्यावर रस्ता ओलांडताना ट्रकने (एम.एच.३१ सी.क्यू. ५८०३) दुचाकीला धडक दिली. यात नंदकिशोर नारायण आत्राम याचा जागीच मृत्यू झाला तर सुनिल गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ट्रकचालक अपघात होताच घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन वाहने ताब्यात घेतली. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)