शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा

By admin | Updated: October 18, 2015 01:00 IST

सावली तालुक्यातील खेडी गावात बिबट्याने पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री सहा फुटाच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन ...

खेडी गावातील घटना : नागरिक दहशतीतसावली : सावली तालुक्यातील खेडी गावात बिबट्याने पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री सहा फुटाच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेऊन बांबूच्या ताटव्यात बांधून असलेल्या शेळ्याचा फडशा पाडला. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सादागड बिटातंर्गत येणाऱ्या खेडी येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून दोन शेळ्या फस्त केल्या. गणेश रामा कंचावार असे शेळी मालकाचे नाव आहे. जि.प. शाळेजवळ या शेळ्याचा गोठा आहे. ५ ते ६ शेळी मालक मिळून या ठिकाणी शेळ्या एकत्र ठेवत असतात. शाळेला लागुनच ग्रामपंचायतीची नर्सरी आहे. रात्रीच्या वेळात हा परिसर शांतच असतो. या परिसराला लागुनच अनेकांची धान शेती आहे. खेडी गावाशेजारी दोन ते तीन कि.मी. अंतरावर आसोलामेंढा नहराला लागून १०८ एकर जागेत सुबाभुळचे खासगी वन आहे. बिबट लपून बसण्याकरिता सोयीची जागा आहे. दिवसभर राहून बिबट रात्रीच्या वेळात गावात प्रवेश करून पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत आहे.आठ दिवसाअगोदर मध्यरात्री सुखरू कंकलवार यांच्या २१ शेळ्या बिबट्याने ठाक मारल्या होत्या. बिबटसारखे हिंस्त्र प्राणी गावात येऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमीब्रह्मपुरी : तालुक्यातील खरकाडा येथे शनिवारी दुपारी महिला शेतावर शेतकाम करीत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. यात मीरा अशोक दिघोरे ही महिला जखमी झाली. महिन्याभरापूर्वी खरफाडा येथे बिबट्याने धुमाकूळ घालून वनविभागाला व गावकऱ्यांना गुंगारा देत पलायन केले होते. वनविभागाने रात्रभर रेस्कू आॅपरेशन सुरू ठेवूनही बिबट्या गळाला लागला नव्हता. वैनगंगेच्या नदीकिनारी दगडाच्या कप्पीत बिबट्याने आश्रय घेतला होता. पहाटेच्या दरम्यान तो पळून गेल्याचे वन विभागाने जाहीर केले होते. परंतु शनिवारी सकाळी ११ वाजता मिरा अशोक दिघोरे ही महिला शेतमध्ये शेतकाम करीत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला. तिने आरडाओरड केल्याने बिबट पळून गेला. त्यानंतर हल्ल्यात जखमी महिलेला खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मागीलवेळी बिबट्याला पकडण्यात वनविभाग अपयशी झाल्याने पुन्हा त्याच बिबट्याने हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या दुसऱ्यांंदा झालेल्या हल्ल्याने खरफाडासह आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरलेली असून बिबट्याला पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.