शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

वैनगंगा नदीत उडी घेऊन दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 12:32 PM

पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. मृताची नावे लता भाऊराव डोईजड (रा. नागभीड) आणि विक्की मारोती चिकणकर (रा. सोनेगाव) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील लता भाऊराव डोईजड (रा. नागभीड) या महिलेने ब्रह्मपुरी- आरमोरी पुलावरून पाण्यात उडी घेतली तर ब्रह्मपुरी- वडसा पुलावरून विक्की मारोती चिकणकर (रा. सोनेगाव) याने सायंकाळी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

मृतक विक्की चिकनकर हा युवक ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी आहे. तीन महिन्यांआधी त्याचे लग्न झाले होते. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता ब्रह्मपुरी-वडसा वैनगंगा नदी पुलावर दुचाकी पुलाच्या कडेला ठेऊन त्याने नदीत उडी घेतली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

लता डोईजड येथील नगभीड येथील रहिवासी असून ब्रह्मपुरी-आरमारी वैनगंगा नदीच्या पुलावरून सोमवारी दुपारी १ ते २ दरम्यान उडी मारली. ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती आहे. ती सकाळी घरी कुणालाही न सांगता निघून गेली होती. घरच्यांनी शोधाशोध केली असता आरमोरी-ब्रह्मपुरी पुलावर चपला व चिठ्ठी मिळून आल्याची माहिती आहे. बचाव पथक इतरत्र व्यस्त असल्याने पोहोचले नाही. बुधवारी बोटीसह बचाव पथक येणार असल्याची माहिती उपविभागीय ( महसूल ) अधिकारी भस्के यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Deathमृत्यूbramhapuri-acब्रह्मपुरी