तलवार घेऊन दहशत पसरविणारे दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST2021-07-30T04:30:01+5:302021-07-30T04:30:01+5:30

चंद्रपूर : येथील एसटी वर्कशॉप चौकात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींकडून तलवार व ...

Two arrested for spreading terror with swords | तलवार घेऊन दहशत पसरविणारे दोघे अटकेत

तलवार घेऊन दहशत पसरविणारे दोघे अटकेत

चंद्रपूर : येथील एसटी वर्कशॉप चौकात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींकडून तलवार व दुचाकी जप्त केली आहे. शाहरूख नूरखान पठाण (२३) रा. खत्री कॉलेजजवळ तुकूम, साहिल इस्माईल शेख (२०) रा. सुमित्रानगर तुकूम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन युवक दुचाकीने हातात तलवार घेऊन दमदाटी करीत दहशत पसरवत होते. याबाबतची माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू यांना मिळाली. त्यांनी एसटी वर्कशॉप चौकात जाऊन चौकशी केली असता दोघेजण तलवार घेऊन दहशत पसरवत असल्याचे आढळून आले. दोघांनाही अटक करून तलवार व दुचाकी जप्त केली. त्यांच्यावर आर्म ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू करीत आहेत.

Web Title: Two arrested for spreading terror with swords