शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली

By admin | Updated: March 16, 2015 00:49 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वरोराच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर या पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या आहेत.

वरोरा: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वरोराच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनानंतर या पंचायत समितीअंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यात आल्या आहेत. वरोरा पंचायत समितीअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्यांसह घरभाडे थकबाकी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. अनेक वेळा संबंधिताच्या भेटी घेतल्या. मात्र समस्या निकाली न निघाल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वरोराच्यावतीने ११ मार्चपासून वरोरा पंचायत समितीसमोर श्याम लेडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरु करण्यात आले. १४ मार्चला आमदार बाळू धानोरकर तसेच जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, दत्ता बोरेकर, अविनाश ढेंगळे, राजू महाजन, बंडू लभाने, राजू लडके, पुरुषोत्तम निखाडे यांच्या उपस्थितीत संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी यांना उपोषण मंडपात बोलावून शिक्षकांच्या घरभाड्याची समस्या प्रत्यक्षपणे कार्यवाही करुन सोडवून घेतली. आमदार बाळू धानोरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी यापुढे शिक्षकांच्या शासनदेय समस्या प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी तसेच ग्रामीण भागात विद्यार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना अशा प्रकारे आंदोलन करण्याची गरज माझ्या क्षेत्रात निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी जि.प. स्तरावरुन वरोरा पं.स. करीता आर्थिक अडचण पडू देणार नाही, अशी हमी दिली. सदर आंदोलनात गजानन कहुरडे, अशोक टिपले, सुभाष कुंभारे, संजय आगलावे, भास्कर गाडगे, माणिक थुटे, अरुण देऊळकर, विजय बरडे, विद्याचरण गोलकर, सुनील बुरेले सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)