शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा-आदिलाबाद मार्गावरून प्रवास करणे झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देमहामार्ग अभियंत्याला निवेदन : नागरिकांना होतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : आदिलाबाद - कोरपणा- राजुरा या राष्ट्रीय महामार्गावरील राजुरा व कोरपना तालुक्यातील परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी हा महत्वपूर्ण मार्ग असून येथूनच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणापासून तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा राज्यापर्यंत वाहतूक केली जाते. या शिवाय लोखंड, सिमेंट कोळसा, गिट्टी खदान उद्योगाची जड वाहतूकही याच रस्त्याने होते. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे.या खड्ड्यांमुळे अनेकवेळा वाहतूक प्रभावित होत आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी या संदर्भात उपविभागीय अभियंत्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदेश सचिव ओम पवार यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदन दिले.पळसगाव-हरणपायली मार्गावर चिखलयेनबोडी : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-हरणपायली या मार्गावर चिखलाचे साम्राज्य असून नागरिकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागते. विशेष म्हणजे, येथूनच टॅक्टर तसेच इतरही वाहने जात असल्याने ंअनेकवेळा रस्त्यावर वाहने फसत असून मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, याच रस्त्याने रेती अवैध वाहतूक सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेकवेळा अडचणीचे होत आहे. त्यामुळे तस्करांवर आळा घालावा, अशी मागणी विकास माऊलीकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग