शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

टोकन पद्धतीमुळे धान विक्रीत पारदर्शकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी टोकन पद्धत अबलंबण्याची योजना आखण्यात आली. यापूर्वी टोकन पद्धती नसल्यामुळे आलेल्या धानाची हेराफेरी होत असल्याची चर्चा होत होती. हे टाळण्यासाठी टोकन पद्धत अवलंबण्यात आली. मूल शहराबरोबरच तालुक्यात राईसमिलची संख्या जास्त असल्याने तादंळाचा व्यापार मोठया प्रमाणात होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम ठरू पाहणारी मूलची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत टोकन पद्धत सुरू केली. धान विक्रीत पारदर्शकता आल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीच्या गेटजवळ धानाची पोती आल्यानंतर त्या संख्येने संबंधित शेतकऱ्यांना टोकन देण्याची पध्दत अवलंब केल्याने शेतकऱ्यांची लूट थांबली आहे. यामुळे शेतकºयांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे दिसून येते.मूल तालुका धानाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गोंदिया जिल्ह्यनंतर मूल तालुक्यात राईसमिलची संख्या सर्वाधिक आहेत. या तालुक्यातील धान मुंबई व इतर मोठया शहरात विक्रीसाठी पाठविला जातो. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यासाठी योग्य भाव व लयलुट थांबविण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचारी प्रयत्नरत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी टोकन पद्धत अबलंबण्याची योजना आखण्यात आली. यापूर्वी टोकन पद्धती नसल्यामुळे आलेल्या धानाची हेराफेरी होत असल्याची चर्चा होत होती. हे टाळण्यासाठी टोकन पद्धत अवलंबण्यात आली. मूल शहराबरोबरच तालुक्यात राईसमिलची संख्या जास्त असल्याने तादंळाचा व्यापार मोठया प्रमाणात होतो. जोरदार, केशर, मालामाल, तेराबारा आदी धानाला सतराशे ते अठराशे रुपये तर जयश्रीराम, ५५५, जयप्रकाश आदी धानाला २२०० ते २५०० असा भाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राहाणार आहे.धानाचे उत्पादन घटणारमागील वर्षी जानेवारी १९ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे १३ कोटी ५७ लाख ९३ हजार ४९२ रुपये किमतीचे धान विक्रीसाठी आले होते. यावर्षी धानाचे उत्पादन समाधानकारक असले तरी धानाची उतारी येणार नसल्यामुळे धानाचे उत्पादन घटणार असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व लयलुट थांबविण्यासाठी टोकन पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे धानाची कृषी उत्पन्न बाजार समितीत आल्यानंतर व्यवहारात पारदर्शकता राहाणार आहे. योग्य भाव व वेळेवर चुकारा देण्याची पध्दत निर्माण करण्यात आल्याने ही प्रक्रिया शेतकºयांच्या हिताची ठरणार आहे.शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव व वेळेवर चुकारा देण्याची पध्दत बाजार समितीने तयार केली. तसेच शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत धान आणल्यानंतर होणारी लूट थांबविण्यासाठी टोकन पद्धत अवलंबली आहे. यामुळे आणलेल्या मालाचे जतन व मालाची हेराफेरी थांबविण्यासाठी मदत झाली आहे.-घनश्याम येनुरकर, सभापती कृ.ऊ.बा. स.मूल

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड