मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

By Admin | Updated: December 21, 2014 22:57 IST2014-12-21T22:57:12+5:302014-12-21T22:57:12+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे व सहकार प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूरच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थाचे तीन दिवसीय सेवक प्रशिक्षण वर्ग वरोरा येथील मत्स्यपालन

Training of office bearers of Fisheries Co-operative Societies | मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

भद्रावती : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे व सहकार प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूरच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील मत्स्यपालन सहकारी संस्थाचे तीन दिवसीय सेवक प्रशिक्षण वर्ग वरोरा येथील मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या सभागृहात पार पडले. सेवक प्रशिक्षण वर्गामध्ये भद्रावती, आष्टा, वरोरा, शेगाव, टेमुर्डा, खांबाडा, भटाळा, नागरी, माढेळी आदी मत्स्यपालन सहकारी संस्थांचे सेवक व पदाधिकारी यांचा सहभाग होता.
प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दामोधर रूयारकर यांचे हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक निबंधक आर. एन. पोथारे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक एन. बी. कोंडावार, लेखा परीक्षक आर. ए. अनंतवार, संयोजक प्रा. आर. एस. आकोटे, शेगाव संस्थेचे अध्यक्ष देवराव ढोके, भद्रावतीचे दिलीप मांढरे व आष्टा येथील रविंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
तीन दिवस चाललेल्या सेवक प्रशिक्षण वर्गात सधन मिश्र शेती, तलावातील मिश्र मत्स्यशेती, मच्छिमार सहकारी संस्था व्यवस्थापन, नियोजन व महत्त्व, गोड्या पाण्यातील मत्स्य आणि कोळंबी शेतीचे व्यवस्थापन आणि सहकारी संस्थांच्या सभा, सभेचे प्रकार व महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरचे प्राचार्य वि.जे. ठोंबरे यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. संचालन व आभारप्रदर्शन प्रा. आकोटे यांनी केले. यावेळी सभासद उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Training of office bearers of Fisheries Co-operative Societies