वाघाचे हल्ले सुरूच; चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी तीन हल्ल्यांमध्ये दोन जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:19 IST2026-03-26T12:18:21+5:302026-03-26T12:19:23+5:30

Chandrapur : व्याघ्र जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात वाघाने वेगवेगळ्या तीन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली.

Tiger attacks continue; Two killed in three attacks on a single day in Chandrapur | वाघाचे हल्ले सुरूच; चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी तीन हल्ल्यांमध्ये दोन जण ठार

Tiger attacks continue; Two killed in three attacks on a single day in Chandrapur

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
व्याघ्र जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी एकाच दिवसात वाघाने वेगवेगळ्या तीन ठिकाणी केलेल्या हल्ल्यांत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. या तिहेरी हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला असून, वनव्याप्त क्षेत्रातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. प्रमिला अरुण वाटगुरे (वय ४०, रा. चिटणीसपुरा तळोधी (बा), बळीराम देवशा पेंदाम (८१, रा. मरेगाव चक, ता. सिंदेवाही) असे मृत व्यक्तीचे, तर नंदा गोकुलदास बन्सोड (६०, रा. भेंडाळा ता. सिंदेवाही) असे जखमी महिलेचे नाव आहे.

बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रेमिला वाटगुरे या ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येत असलेल्या तळोधी (बा) वनपरिक्षेत्रातील तळोधी बा. बिटातील सावर्ला स्मशानभूमीलगत असलेल्या जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने प्रेमिलावर हल्ला चढवून तिला अर्धा किलोमीटर अंतरावर फरफटत नेले. दरम्यान, इतर महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ पळून गेला. मात्र, प्रेमिलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार, क्षेत्रसहायक अरविंद मने, गोंविदपूरचे क्षेत्रसहायक सय्यद व वनविभागाचे वनरक्षक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडला पाठवला. घटनास्थळावर वनविभागाच्या वतीने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. 

मोहफूल व मोहरी तोडणीला केलेल्यांवर सिंदेवाहीत हल्ला

बुधवारी बळीराम पेंदाम हे सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपक्षेत्र तांबेगळी अंतर्गत मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १३७५ मध्ये मोहफूल संकलित करण्यासाठी गेले होते. सायंकाळ झाली तरी ते परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेतला असता त्याचा मृतदेहच आढळून आला.

घटनास्थळावरील पाहणीवरून वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) व पोलिस निरीक्षक कांचने पांडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, तर सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भेंडाळा येथे नंदा गोकुलदास बन्सोड या आपली सून मुक्ता बन्सोड हिच्यासोबत मोहरी तोडण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने नंदा यांच्यावर हल्ला चढविला. वाघ दिसताच सून मुक्ता ही आरडाओरड करायला लागली. त्यामुळे वाघ पळून गेला. मात्र, नंदा बन्सोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title : बाघ के हमले जारी: चंद्रपुर में एक ही दिन में दो की मौत

Web Summary : चंद्रपुर में बाघ के हमलों में दो लोगों की मौत हो गई और एक घायल हो गया। घटनाएँ तलोधी और सिंदेवाही वन क्षेत्रों में हुईं। हमलों से ग्रामीणों में दहशत फैल गई है।

Web Title : Tiger Attacks Continue: Two Killed in Chandrapur in One Day

Web Summary : In Chandrapur, tiger attacks resulted in two fatalities and one injury. Incidents occurred in Talodhi and Sindewahi forest areas. The attacks have caused widespread fear among villagers.