शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वटवाघळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: February 25, 2015 01:20 IST

रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल.

खडसंगी : रात्रीची भयान शांतता, जुनी इमारत, पडका वाडा व त्यामध्ये वटवाघळांचे अस्तित्व. ही कल्पना भयान भीतिदायक वाटत असली तरी वटवाघळांचे अस्तित्व नाहीसे झाल्यास निसर्गाचे चक्र बंद पडेल. हे होवू नये म्हणून मानवी संघटना व शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पक्षी मित्र संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.वटवाघूळ हा सस्तन पक्षी असून वन विभागाच्या शेड्यूल पाचमध्ये समाविष्ट आहे. वटवाघुळ निशाचर वृत्तीचा पक्षी आहे. रात्रीच्या वेळी किटक, डास, किडे, मुंगी, पाल, लहान आकाराचे साप, विंचू आणि लहान आकाराचे उंदीर खावून पोट भरणे व दिवसा सूर्य प्रकाशापासून दूर जावून थंड ठिकाणी गुहा, झाडाच्या फांदीला लोंबकळत निद्रा घेणे अशा प्रकारे दिवस व रात्रीची दिनचर्या असणाऱ्या उदर गटातील हा प्राणी होय. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या उंच इमारती, वृक्षतोड, उंच इमारतीवरील चमकणाऱ्या काचा आदी कारणांनी वटवाघुळाचे स्थलांतर होतांना त्यांचे प्रजनन सुद्धा थांबते.वटवाघळांची कमी झालेली संख्या हेच किटक वाढीचे मुख्य कारण आहे. कारण रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणवर किटक खाण्याचे काम वटवाघुळे करतात. एका रात्री साधारणपणे एक वटवाघुळ दीड ते दोन हजार डास फस्त करते. पूर्वीच्या काही गावांच्या बाहेर पिपड, वड आदी मोठ्या झाडाखाली वटवाघुळे असत. सध्या मात्र झाडे व वटवाघुळे सुद्धा दिसत नाहीत. वटवाघुळ व घुबड यांच्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगामध्ये निसर्गसाखळी वाचवण्यासाठी त्याची गरज आहे. वृक्ष न तोडता त्याचे पुर्नरोपन करावे व वटवाघुळाची शिकार करु नये, असे नियम करावेत. त्यामुळे वटवाघुळाचे अस्तित्व टिकून राहील. (वार्ताहर)