शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 23, 2015 01:04 IST

जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

वतन लोणे घोडपेठजिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथे धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमी. या ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीच्या उद्योग प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. मात्र या प्रकल्पाच्या मान्यतेनंतरही परिसरातील अनेक सुशिक्षीत तरूण बेरोजगार फिरत आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित तरूणांचे या आस्थापनेत काम करून उदरनिर्वाह करण्याचे स्वप्न भंगले आहे.ताडाळी एमआयडीसी येथे ६०० मेगावॅट उर्जा निर्मितीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झाला नसल्यामुळे अनेक बेरोजगार तरूणांचे भविष्य प्रकल्पाच्या निमीत्त्याने टांगणीला लागले आहे.सध्या ताडाळी येथील एमआयडीसी ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची एमआयडीसी संबोधली जाते. बरेचशे उद्योग या एमआयडीसी मध्ये स्थापन झाले आहेत. मात्र बऱ्याच उद्योगांना अखेरची घरघर लागल्याने या परिसरातील कामगार तसेच मजुरांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. ताडाळी येथील उर्जानिमीर्ती प्रकल्पाचे बांधकाम मागील पाच-सहा वर्षांपासून सुरू आहे.ताडाळी व परिसरातील नागरिकांची ५०० एकर जमिन या प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. मात्र शेतकऱ्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे एकमात्र साधन उद्योगाच्या स्वरूपात हिरावल्यामुळे तसेच उद्योग अजुनपर्यंत सुरू न झाल्यामुळे जगायचे कसे, या विवंचनेत ताडाळी परिसरातील शेतकरी व मजुरवर्ग सापडला आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे.आस्थापनेला मराठी तरूणांची अ‍ॅलर्जीप्रत्येक आस्थापनेमध्ये ८० टक्के जिल्ह्यातील कामगारांना रोजगार द्यावा, असा शासनाचा नियम आहे. मात्र धारीवाल आस्थापनेमध्ये या नियमाला बगल देवून बऱ्याचशा लहानमोठ्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने दुसऱ्या राज्यातील मजुरांना काम दिले जाते. त्यामुळे मराठी तरूणांना काम मिळत नसून जिल्ह्यातील तरूणांची कुचंबणा होत आहे. बऱ्याच कामगारांना १५ दिवसांचे काम कंपनीकडून पुरविण्यात येत आहे. कुटूंब कसे चालवायचे, या विवंचनेत कामगार वर्ग सापडला आहे.नोकरीवरून काढण्याचा सपाटाताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक या पदावर बरेच मराठी तरूण कंत्राटी पध्दतीने मागील पाच-सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र धारीवाल प्रशासनाला मराठी तरूणांची अ‍ॅलर्जी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोणत्याही लहान-मोठ्या कारणांवरून सुरक्षा रक्षकांना नोकरीवरून काढण्याचा पर्याय कंपनीकडून स्वीकारला जात आहे. कंपनीचे उच्चपदस्थ सुरक्षा अधिकारी हे सुरक्षारक्षकांची पिळवणुक करीत असल्याचा आरोप सुरक्षा रक्षकांनी केला आहे.सुरक्षा रक्षकांचा न्यायासाठी संपशुक्रवारी धारीवाल आस्थापनेतील सुरक्षा रक्षकांकडून संप पुकारण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांनी न घेतलेल्या आगाऊ रकमेची पगारातून कपात करण्यात आली होती. मात्र संपाचा बडगा उगारल्यामुळे धारीवाल प्रशासनाने सर्व सुरक्षारक्षकांचे कपात केलेले वेतन परत करण्याचे मान्य केले. तसेच काहीच कारण नसतांना आत्तापर्यंत निलंबीत केलेल्या सुरक्षारक्षकांवर भाष्य करण्यास कंपनी प्रशासनाने नकार दिला आहे. सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.