शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले

By admin | Updated: February 4, 2016 00:54 IST

निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेतृत्व : दुष्काळी परिस्थितीत जगावे कसे?चंद्रपूर: निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा. असा प्रश्न करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आघाड्याचे कार्यकर्ते सहभागी असलेला लक्षवेधी मोर्चा दुपारी २ वाजता स्थानिक बाबुपेठ मार्गावरील शिवाजी चौकामधून निघाला. ‘फडणवीस सरकार हाय हाय’ म्हणत चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अतिक्रमणधारकांना शेतजमीनीचे पट्टे देण्यात यावे, अशा घोषणा देत मोर्चेकरी गांधी चौक, जटपुरा गेटमागर््ो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण निमजे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्याय देण्यास अकार्यक्षम ठरलेल्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी होवून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी लक्षवेध मोर्चात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. फडणवीस सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे सांगून सरकारचा निषेध नोंदवून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भविष्यात प्राणांतिक उपोषणाचा मार्ग स्विकारु असे जाहीर केले. सभेचे संचालन शहर अध्यक्ष शशीकांत देशकर यांनी केले.यावेळी मोर्चेकरी शेतकरी व कार्यकर्त्यांच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेवून चौदा मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीही निवेदनातील ज्या मागण्या जिल्हास्तरावर सोडविता येणाऱ्या आहेत, त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, सुदर्शन निमकर, शशीकांत देशकर, दीपक जयस्वाल, हिराचंद बोरकुटे, महादेव पिदुरकर, अरुण निमजे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, बेबी उईके, सुरेश रामगुंडे, प्रशांत गाडेवार, प्रविण उरकुडे, जयस्वाल आदींचा समावेश होता. मोर्चा यशस्वीतेसाठी नितीन भटारकर, सुमित समर्थ, हरिदास झाडे, विलास नेरकर, दामोधर नन्नावार, अविनाश राऊत, मंगेश पोटवार, सचिन राऊत आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)