ब्रह्मपुरीत शेतकऱ्यांचे घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:56 IST2018-08-22T00:55:30+5:302018-08-22T00:56:03+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ब्रह्मपुरीत शेतकऱ्यांचे घंटानाद
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील पिंपळगाव, मालडोंगरी, अºहेर नवरगाव, नान्होरी या परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
शहरातील राममंदिरपासून तहसील कार्यालयापर्यंत घंटानाद आंदोलन रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी कर्जमाफी झालीच पाहीजे, अशा घोषणा देत होते. घंटानाद आंदोलनातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, मागील वर्षी तुडतुड्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, पीकविम्याचा लाभ देण्यात यावा, सोंदरी गावाजवळ गोसेखुर्दचा लहान कालवा फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना भरपाई देण्यात यावी आदी विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, प्रभाकर सेलोकर, वामन मिसार, नेताजी मेश्राम, नरेश सहारे, वासू सोंदरकर, जयपाल पारधी, सुधीर शिवणकर, कपिल राऊत, संदीप बगमारे, विनोद बुल्ले, योगेश कोलते, दोनाडकर बाबुसाहेब, केशव भूते, सुनील धांडे, भास्कर नाकतोडे, गुड्डू बागमारे, राजेश तलमले, शामराव कुथे यांच्यासह तालुक्यातील अºहेर नवरगाव, पिंपळगाव परिसरातील शेतकरी उपस्थितीत होते.