शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

महोत्सवाचा तिसरा दिवस रणरागिनींनी गाजवला

By admin | Updated: January 5, 2016 01:21 IST

महिलांच्या उन्नतीसाठी चर्चासत्र घडवून आपले अनुभव कथन करीत बालवयापासून वृद्धापकाळापर्यंत सर्वांगीण विकास कसा

रवी रणदिवे ल्ल ब्रह्मपुरीमहिलांच्या उन्नतीसाठी चर्चासत्र घडवून आपले अनुभव कथन करीत बालवयापासून वृद्धापकाळापर्यंत सर्वांगीण विकास कसा साध्य करावा, हे महिलांनीच उलगडून दाखविले. एकूणच ब्रह्मपुरी महोत्सवाचा तिसरा दिवस रणरागिनींनी गाजविला.‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर विचार व्यक्त करताना भुवनेश्वरी परशुरामकर (नागपूर) व हिमांगी गोरे (नागपूर) यांनी तब्बल पाच तास व्याख्यान देऊन हजारो महिलांना सोमवारी मंत्रमुग्ध केले आहे. महिला सर्व क्षेत्रात असुरक्षित असल्याने आपणच स्वत:ची रक्षा कसे करु शकतो, यासंदर्भात विविध उदाहरणे देत महिलांना विचार करण्यास भाग पाडले. या कार्यक्रमामुळे असंख्य महिलांना आज खऱ्या अर्थाने हक्काचे व्यासपीठ महोत्सवानिमित्त मिळाल्याचे सूर कार्यक्रमस्थळी उमटत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रश्मी पेशने होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा फुलझेले, पुष्पलता बुराडे, भावना इरपाते, अ‍ॅड. राम मेश्राम उपस्थित होते. संचालन भिमादेवी डांगे तर आभार सरिता तातेडे यांनी मानले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आज सकाळी १० किमी सायकल दौड स्पर्धा विलास वनकर यांच्या व्यवस्थापनाखाली घेण्यात आली. त्यामध्ये ३५ युवती व ६५ युवकांनी सहभाग घेतला होता. युवतीमधून प्रथम दर्शना कावळे व निशा गायकवाड द्वितीय क्रमांक पटकाविलेला आहे. तर युवकांमध्ये चंद्रकांत गावतुरे प्रथम व रुपेश दवै द्वितीय स्थानावर विजयी झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जवळपास शेकडो महिलांनी स्पर्धेत भाग घेतला होता. सायंकाळी ७ वाजता ‘तथागत’ या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. नाटक पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.कृषी प्रदर्शनाला दिवसभर गर्दी४दोन मोठ्या पेंडालमध्ये कृषी व व्यापार प्रदर्शन लावण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक नागरिक सपत्नीक येऊन प्रदर्शना पाहू लागले व प्रदर्शनातील वस्तूंची खरेदीही करु लागल्याचे चित्र दिसत होते. तसेच शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना रांगेमधून प्रदर्शन दाखविण्याचे कार्य सुरु होते.आमदार व कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ४ आयोजक आमदार विजय वडेट्टीवार व सोबत विलास विखार, सतिष कावळे, नितीन उराडे, मनोज कावळे, प्राचार्य डॉ. अमिर धम्मानी, नंदू पिसे, व इतर सकाळपासून ते रात्रीपर्यंत महोत्सवाच्या ठिकाणी भेटी देत नियोजन करताना दिसत होते. आमदार व कार्यकर्ते उभ्याउभ्याच चहापाणी घेऊन येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाला हजेरी लावून मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकल्याचा लवलेशही दिसून येत नव्हता, हे विशेष. महिला मेळाव्याच्या प्रतिक्रियामहिला व सबलीकरण विषयावरील व्याख्यान पुन्हा पुन्हा ऐकावे असे होते. आम्हाला मार्गदर्शन खऱ्या अर्थाने आज प्राप्त झाले आहे.- रेश्मा लाखानी, ब्रह्मपुरीकृषी प्रदर्शनी व महिला विषयक मार्गदर्शन व एकूणच महोत्सव अप्रतिम दर्जाचे असल्याने आयोजकाचे खूपखूप आभार.- प्रियंका मेंढे, ब्रह्मपुरी