शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

साखळी उपोषणाचा तिसरा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 01:26 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ही करवाढ मागे करण्यात यावी, या व इतर ....

मालमत्ता करवाढ : आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ही करवाढ मागे करण्यात यावी, या व इतर आणखी काही मागण्यांच्या पूर्ततेकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने येथील गांधी चौकात साखळी उपोषण सुरू आहे. मनपातील काँग्रेसचे नगरसेवकही नागरिकांसह उपोषण करीत आहेत. सोमवारपासून काँग्रेस नगरसेवकांनी गांधी चौकात साखळी उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी नगरसेवक प्रशांत दानव, प्रविण पडवेकर, राजेश यादव व सुनील बोरने हे उपोषणाला बसले होते. ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका सकिना अंसारी, लक्ष्मी पारनंदी, कार्यकर्त्या शमीम मोहम्मद इस्राईल व आशिया परवीन मोहम्मद हारुण यांनी उपोषण केले.दरम्यान, आज बुधवारी माजी खासदार नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, शहर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर यांच्या हस्ते ८ मार्चला उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याला लिंबू पाणी देण्यात आले. बुधवारी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार, देवीदास गेडाम, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी व भारत जंगम हे उपोषणाला बसले. यावेळी नरेश पुगलिया यांनी सदर आंदोलन हे जनतेच्या हितासाठी असून आणखी ते तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. मालमत्ता करात मनपाने केलेले वाढ ही जनतेसाठी अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (शहर प्रतिनिधी)