वरोरा शहरात लागोपाठ तिसरी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:56+5:302021-02-05T07:32:56+5:30

वरोरा शहरातील आंबेकर ले-आउट करंजी रोड येथे वास्तव्यास असलेले ऋषी मडावी हे गृहस्थ पत्नीसह समुद्रपूर येथील सासुरवाडीला गेले व ...

The third consecutive burglary in the city of Warora | वरोरा शहरात लागोपाठ तिसरी घरफोडी

वरोरा शहरात लागोपाठ तिसरी घरफोडी

वरोरा शहरातील आंबेकर ले-आउट करंजी रोड येथे वास्तव्यास असलेले ऋषी मडावी हे गृहस्थ पत्नीसह समुद्रपूर येथील सासुरवाडीला गेले व मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी वरोरा निवासस्थानी आले असता त्यांच्या घराच्या समोरील दाराचे कुलूप तुटलेले होते. आत जाऊन बघितले असता लोखंडी कपाट उघडे होते. त्या कपाटातील सोन्याच्या मण्याची पोत, सोन्याचे कानातील वेल, दोन अंगठ्या, नथनी, कानातील टॉप्स व चांदीचे जोडवे असा एकूण १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार देण्यात आली. यापूर्वी वरोरा शहरालगतच्या दोंदेनगर येथे भरदिवसा घरफोडी झाली. त्यानंतर फुकटनगर येथे घरफोडी झाली. वरोरा शहरात सतत तीन दिवसांत तीन घरफोड्या झाल्याने नागरिक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे. वरोरा पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: The third consecutive burglary in the city of Warora