ते शिशू चंद्रपूरच्या शिशूगृहाकडे हस्तांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST2021-06-10T04:20:06+5:302021-06-10T04:20:06+5:30

३ जून रोजी सकाळी सात साडेसातच्या सुमारास येथील जीवनरक्षा हाॕॅस्पिटलच्या मागे शेताच्या बांधीतून नवजात शिशूचा रडण्याचा आवाज आला. काही ...

They transferred the infant to the orphanage at Chandrapur | ते शिशू चंद्रपूरच्या शिशूगृहाकडे हस्तांतरित

ते शिशू चंद्रपूरच्या शिशूगृहाकडे हस्तांतरित

३ जून रोजी सकाळी सात साडेसातच्या सुमारास येथील जीवनरक्षा हाॕॅस्पिटलच्या मागे शेताच्या बांधीतून नवजात शिशूचा रडण्याचा आवाज आला. काही व्यक्ती त्या आवाजाच्या दिशेने गेले असता बांधीत एक शिशू असल्याचे दिसून आले. लागलीच या व्यक्तींनी पोलिसांना माहिती देऊन या नवजात अर्भकास येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

येथील बालरोगतज्ज्ञ डाॕॅ. विजय काळे यांनी या शिशूवर उपचार व संगोपन केले. शिशूचे स्वास्थ्य उत्तम झाल्यानंतर नागभीड पोलिस ठाण्यामार्फत जिल्हा बाल संरक्षण समिती आणि शिशूगृह चंद्रपूर यांच्याकडे या शिशूला हस्तांतरित करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डाॕॅ. विजय काळे, प्रभारी गटविकास अधिकारी भस्मे, स.पो.नि.खेडीकर, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते.

Web Title: They transferred the infant to the orphanage at Chandrapur