शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मार्गाला जोडणाऱ्या सहा मार्गांची होणार सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 01:56 IST

चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या व प्रमुख जिल्हा मार्ग ३८ ला जोडणाऱ्या सहा पोच मार्गाची सुधारणा लवकरच केली जाणार असून

कीर्तीकुमार भांगडिया : दहा किमीसाठी पाच कोटींचा निधी चिमूर : चिमूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या व प्रमुख जिल्हा मार्ग ३८ ला जोडणाऱ्या सहा पोच मार्गाची सुधारणा लवकरच केली जाणार असून यासाठी शासनाच्या रस्त्यांचे संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत पाच कोटी ७९ लाखांंचा निधी नुकताच मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली आहे. या सहा मार्गाची सुधारणा झाल्याने ते प्रमुख जिल्हा मार्गाला जोडले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेने नुकतेच अधीक्षक अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे नुकतेच वर्ग केले. चिमूर ही क्रांतिभूमी असली तरी चिमूरचा विकास गेल्या कित्येक वर्षापासून खुंटलेला होता. शासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत होते. परंतू राज्यात भाजपा महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर व या मतदार संघाचे नेतृत्व आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्याकडे आल्याने शेकडो विकासाची कामे हाती घेण्यात आली. चिमूरला नगरपालिकेचा दर्जा देणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी गोंदोडा गुंफेचा सर्वांगिण विकास करणे, श्रीहरी बालाजी यांच्या अधिनस्त असणाऱ्या बालाजी सागराचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करणे, नागभीडला नगरपालिका स्थापन करणे असे अनेक ऐतिहासिक निर्णय आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्या भगिरथ प्रयत्नाने पूर्णत्वास आले आणि आता प्रमुख जिल्हा मार्ग ३८ ला जोडणाऱ्या विविध गावातील पोचमार्गाचे काम हाती घेण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तुकूम, बामणी, तळोधी, टेकेपार, सातारा व मासळ या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तुकूम येथील पोचमार्गाची सुधारणा झाल्यानंतर या रस्त्यामुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटनास फायदा होणार आहे. एक किमीचा हा रस्ता संपूर्ण सिमेंट काँक्रीटचा प्रस्तावित असून या रस्त्यावर ५०० मीटर पक्क्या नालीचे बांधकामही घेण्यात आले आहे. उपलब्ध निधीतून रस्त्याचा विकास होत असताना पुढील पाच वर्ष या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीसाठी मोठी तरतूद केली आहे. (तालुका प्रतिनिधी) ग्रामीणांचे उत्पन्न वाढविण्यास रस्ते आवश्यक शहराचा विकास कितीही झाला तरी जोपर्यंत शहर मजबूत रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्राला जोडले जात नाही, तोपर्यंत विकास झाला असे म्हणता येणार नाही. जिल्ह्यातील प्रमुख मार्गाला गावातून येणारे महत्त्वपूर्ण रस्ते योग्य स्थितीत असतील तर ग्रामीणांसाठी ते दळणवळणाचे प्रमुख साधन होऊन जाते. यामुळे ग्रामीण भागातील व्यक्ती थेट शहराशी जोडला जातो. त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या उत्पन्न वाढीवर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते दीर्घकाळ टिकणारे आणि प्रमुख मार्गाला जोडणारे असावे. ग्रामीणांचे उत्पन्न वाढविण्यासाठी रस्ते मजबूत असणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया आ. किर्तीकुमार भांगडिया यांनी दिली.