शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:37+5:30
नागपूर विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली.

शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणी मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षकांना पूर्व पद्धतीनुसार वरिष्ठ व निवडश्रेणी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती. नुकत्याच शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत सदर मागणी मान्य करण्यात आली.
नागपूर विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर व भंडारा येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात झालेला गैरव्यवहार, अतिरिक्त शिक्षकाचे जिल्हास्तरीय समायोजन, विभागस्तरीय समायोजन, वेतन एक तारखेला करणे, प्रलंबित मेडिकल बिल, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके आदीबाबत उपसंचालक याच्यासोबतच चर्चा करण्यात आली. तर काही मागण्या मान्य करण्यात आल्या. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव कारेमोरे, प्रातीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, राजेश धुर्वे, रेवतकर, सालनकर उपस्थित होते.