पेपर तपासण्याच्या नावावर विनयभंग; शिक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 12:39 IST2022-04-19T12:37:53+5:302022-04-19T12:39:29+5:30

शाळेत शिकणाऱ्या इतर सहा मुलींबरोबर याच प्रकारचे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Teacher arrested for molestation of girl students in the name of checking papers | पेपर तपासण्याच्या नावावर विनयभंग; शिक्षक अटकेत

पेपर तपासण्याच्या नावावर विनयभंग; शिक्षक अटकेत

ठळक मुद्देहिरापूरच्या शाळेतील प्रकार

जिवती (चंद्रपूर) : विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी जिवती तालुक्यातील हिरापूर येथील एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा शिक्षक हिरापूर गावातील जि.प. प्राथमिक शाळेत शिकवतो. ए. के. राठोड (४९) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

हा शिक्षक पेपर तपासण्याच्या बहाण्याने पीडित मुलींना कार्यालयात बोलावून घेऊन फिर्यादी मुलीच्या छातीला हात लावणे, तोंड लावणे असा प्रकार मागील एक वर्षांपासून करत होता. याच प्रकारचे कृत्य शाळेत शिकणाऱ्या इतर सहा मुलींबरोबर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलींच्या तोंडी रिपोर्टनुसार जिवती पोलिसात तक्रार केली असून अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, राजा पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा अतिरिक्त प्रभार हे तपास करीत आहेत. 

निशा खोब्रागडे, महिला पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करीत आहेत. शाळेतील शिक्षकांच्या वादात आरोपी शिक्षकाचा बळी गेला अशी दबक्या आवाजात जनतेत चर्चा सुरू आहे.  

शालेय विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी शिक्षकाविरुद्ध मुलींच्या तोंडी रिपोर्टनुसार तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षकाला अटक ही करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे. - रवींद्र म्हैसकर, पोलीस उपनिरीक्षक,

Web Title: Teacher arrested for molestation of girl students in the name of checking papers