शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:01 IST

मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गावांचा कारभार सोपविण्यात आला.

ठळक मुद्देअतिरिक्त तहसीलदार नियुक्तीची मागणी : ४० गावे आहेत जुळली

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे मुख्य तहसीलमधून काही गावांचा भार कमी व्हावा, यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती मोठा गाजावाजा करून करण्यात आली. अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली. मात्र अल्पावधीतच त्यांची बदली झाली. दरम्यान, काही दिवस नायब तहसीलदार यांच्या भरोशावर कारभार चालला. मात्र अलिकडे या ठिकाणी अधिकारीच राहत नसल्याने हे अप्पर कार्यालय वाºयावर सोडले आहे. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गावांचा कारभार सोपविण्यात आला.परिसरातील नागरिकांचे कामे सदर कार्यालयात तातडीने व्हावे, यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सहा महिन्यातच अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले.परिसरातील नागरिकांसाठी नागभीड हे अंतर दूर असल्याने जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, नागरिक व विद्यार्थ्यांची कामे इत्यादींसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.छोटा मोठ्या कामासाठी नागभीड तहसील कार्यालयामध्येच जावे लागत आहे. तळोधीचे अप्पर तहसील कार्यालय हे रामभरोसे असल्याने पुन्हा मुख्य तहसील कार्यालयावरच ४० गावांचा भार आलेला आहे. दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी नवीन तहसीलदाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांसह वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.परिसरातील ४० गावांच्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने सदर अप्पर तहसील कार्यालयात अतिरिक्त तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात यावी व कारभार सुरळीत करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अश्विन मेश्राम, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :Tahasildarतहसीलदार