शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: July 2, 2014 23:16 IST

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती डी.के. आरीकर यांनी केले. येथील वनप्रशिक्षण संस्था, वनराजिक महाविद्यालय,

चंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती डी.के. आरीकर यांनी केले. येथील वनप्रशिक्षण संस्था, वनराजिक महाविद्यालय, पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. सर्वप्रथम वृक्षारोपण करून व वडाच्या झाडाची पूजा करून खासदार हंसराज अहीर यांनी पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी मंचावर समितीचे अध्यक्ष डी.के. आरीकर, आमदार नाना शामकुळे, अ‍ॅड. भगवान पाटील, राकाँच्या महिला फ्रंटच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा जोशी, पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे उपाध्यक्ष राजेश सोलापन, संघटक सुरेश शर्मा, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी (सामाजिक वनीकरण) धांडे आदींची उपस्थिती होती. खा. हंसराज अहीर म्हणाले, चंद्रपूर जिल्हा वनाच्छादित प्रदेश म्हणून ओळखला जात असतानाच मात्र आता येथील प्रदूषण गंभीर बाब बनत चालली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उद्योगावर वचक राहिला नसून जिल्ह्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी स्वत: येऊन पुढाकार घेतल्यास प्रदूषण नियंत्रणावर मात करता येईल.प्रास्ताविकात अ‍ॅड. भगवान पाटील म्हणाले, सोशल सायन्सचा आतापर्यंत मानवामध्ये विकास झालेला नाही. प्रत्येक नागरिकाने मॅन पावरवर अवलंबून न राहता विधायक मार्गाचा अवलंब करून वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलित करण्याचे आवाहन केले.याच कार्यक्रमात पर्यावरण विशेषांकाचेसुद्धा पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक म्हणून केवशराव मांडवगडे, सुधीर चंद्रात्रे, तर पर्यावरण मित्र म्हणून बंडोपंत बोडेकर, अनुप पाल, दिनकर म्हशाखेत्री, मिरा कामडी, ज्योती एकोणकर, वंदना मुनघाटे, विणा भगत, प्रगती माकोडे, राजू हनमंते, रविंद्र मोरे, मोरेश्वर पेंदाम, अशोक दहेलकर यांचा पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष रोपटे, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रसिका विंचूरकर नागपूर यांना प्रथम, अभिलाषा झाडे चंद्रपूर हिला द्वितीय व आयुषा आरीकर भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला. जयश्री कस्तुरे, गुणिका पोटदुखे या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. (शहर प्रतिनिधी)