शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांचा युरियासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

नागभीड तालुक्यास वार्षिक एक हजार ६०० टन युरियाची गरज आहे. मात्र कधीच आवश्यकतेनुसार युरिया प्राप्त झाला नाही. परिणामी तालुक्यात युरियाची दरवर्षीच टंचाई निर्माण होत असते. सद्य:स्थितीत भारी व हलक्या धान पिकाला युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याचवेळी नागभीड तालुक्यात युरियाची टंंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी बेभाव दराने विक्री होत असल्याचा आरोप आहे. माहितीनुसार नागभीड येथे युरिया पोहचायला आणखी चार ते पाच दिवस लागतील, असा अंदाज आहे.नागभीड तालुक्यास वार्षिक एक हजार ६०० टन युरियाची गरज आहे. मात्र कधीच आवश्यकतेनुसार युरिया प्राप्त झाला नाही. परिणामी तालुक्यात युरियाची दरवर्षीच टंचाई निर्माण होत असते. सद्य:स्थितीत भारी व हलक्या धान पिकाला युरिया खताची नितांत आवश्यकता आहे. मात्र नेमक्या याचवेळी नागभीड तालुक्यात युरियाची टंंचाई निर्माण झाली आहे.नागभीड तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात येते. यापैकी २० हजार हेक्टरमध्ये रोवणी तर ५ हजार हेक्टरमध्ये आवत्या असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. धान या पिकास यावेळी युरिया या खताची अत्यंत आवश्यकता असते. मात्र नेमक्या याचवेळी बाजारात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी युरिया हे खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जात असले तरी कृषी केंद्र संचालकांकडे युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे. माहितीनुसार नागभीड तालुक्यात  सहा होलसेल विक्रेते आहेत. या ठोक  विक्रेत्यांकडून छोट्या विक्रेत्यांना वितरण करण्यात येते.

दरवर्षी हीच परिस्थिती दरवर्षीच्या हंगामाचा विचार केला तर नेमक्या याच परिस्थितीत दरवर्षी युरिया खताची टंचाई निर्माण होत असते. ही टंचाई नेमक्या याच वेळी का निर्माण होते, याची कारणमिमांसा संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांनी करणे जरुरीचे आहे. या कालावधीत धान पिकाला युरियाचे डोस मिळाले नाही तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यात दोन-तीन दिवसांत युरिया प्राप्त होईल, असे कृषी अधिकारी नितीन ऊईके यांनी सांगितले.

चढ्या भावाने विक्री काही कृषी केंद्र संचालकांकडे युरिया उपलब्ध असून हे कृषी केंद्र संचालक शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने युरियाची विक्री करीत असल्याची माहिती आहे. मात्र तालुक्यातील कोणत्याही अधिकाऱ्याचे याकडे लक्ष नाही. 

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी