शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धानाच्या पाण्यासाठी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

By admin | Updated: October 17, 2015 01:32 IST

करारनामा करुनही आसोला मेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना ...

अखेर अधिकारी नमले : शेतीला पाणी देण्याचे लेखी आश्वासन मिळालेचंद्रपूर: करारनामा करुनही आसोला मेंढा तलावातील पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी नकारात्मक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी शेतकऱ्यांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून वठणीवर आणले. या आंदोलनाचा धसका घेऊन अखेर सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण घेतले आणि शेतकऱ्यांना पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले.जिल्ह्यातील धान पिकांसह अन्य पिकांचीही स्थिती पावसाअभावी भीषणावह झाली आहे. शेतातील धानाचे उभे पिक पाण्याअभावी सुकायला लागल्याने १२ आॅक्टोबरला शेतकऱ्यांनी नांदगाव (ता. सावली) सिंचाई शाखा अभियंत्यांना भेटून शेतीसाठी या तलावाचे पाणी सोडण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या शेतासाठी पाणी सोडण्याचा करारनामा या विभागाचा असल्याने तांत्रिक अडचण कसलीही नव्हती. मात्र शेतकऱ्यांनी विनंती करुनही अधिकारी मात्र ऐकायला तयार नव्हते. दिघोरी आणि गोवर्धन मायनरसाठी १६ आॅक्टोबर च्या दुपारी १ वाजेपर्यंत पाणी साडव्याचे लेखी आश्वासन १२ आॅक्टोबरला अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र ही वेळ उलटूनही अधिकारी दाद देत नव्हते. अखेर आज (शुक्रवारी) दुपारी १२ वाजता आसोला मेंढा तलावाखालील दिघोरी व गोवर्धन मायनर खालील शेतकऱ्यांनी फूटाणा क्रांसिंग ते सिंचाई कार्यालय नांदगावपर्यंत जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांच्या नेतृत्वात सरकारच्या निषेधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. शेतीलापाणी मिळालेच पाहिजे पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी दणाणून सोडला. अखेर मूल तहसीलदार उपविभागीय अभियंता सिंचाई उपविभाग सावली शाखाधिकारी सिंचाई शाखा नांदगाव आणि मूल ठाणेदारांनीपाचारण केले.शिष्टमंडळात विनोद अहिरकर, कवडू कुदावार, दिलीप म्यॉडावार, इंद्रजीत वनकर, रवी मरपल्लीवार, प्रशांत झाडे, दादाजी व्याहाडकर, प्रमोद ओदेलवार, नरेंद्र उमक, उमेश इनमवार, आशिष अहिरकर, सुधाकर बांबोळे, महेश अल्लीवार, मनोज अहिरकर आदी सहभागी होते. अखेर सिंचाई विभागाच्या शाखा अभियंत्यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यावरच सर्वांचे समाधान झाले. (जिल्हा प्रतिनिधी)