पांढरवाणी येथे शाश्वत शेती प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:38+5:302020-12-11T04:56:38+5:30

वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील पांढरवाणी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत शाश्वत शेती प्रशिक्षण घेण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलीस ...

Sustainable Agriculture Training at Pandharwani | पांढरवाणी येथे शाश्वत शेती प्रशिक्षण

पांढरवाणी येथे शाश्वत शेती प्रशिक्षण

वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील पांढरवाणी येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत शाश्वत शेती प्रशिक्षण घेण्यात आले. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील नशिकेत आत्राम तर मार्गदर्शक मंडळ कृषी अधिकारी ए. आर. महाले, प्रगतीशील शेतकरी गुरुदास मसराम, वर्षा आळे, व्ही.जी.निमगडे, कृषी सहाय्यक डी. व्ही. भानारकर, आर. एस. धुडे आदी उपस्थित होते. महाले यांनी जमिनीचे आरोग्य, जमिनीचे गुणधर्म आणि जमीन आरोग्य पत्रिका वाचन व महत्त्व माती नमुने काढणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले. धुडे यांनी जमिनीचे मुख्य अन्नद्र्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्र्रव, सेंद्रिय पदार्थ, हिरवळीचे खत, जीवाणू खतांचा वापर व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. गुरुदास मसराम यांनी सेंद्रिय शेती पद्धती, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, जीवामृत व लसूण, मिरची, अद्रक अर्काचा वापर करण्याचे सांगण्यात आले. संचालन धुडे यांनी केले. कृषी सहाय्यक डी. व्ही. भानारकर यांनी आभार केले.

Web Title: Sustainable Agriculture Training at Pandharwani