पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:03+5:302020-12-11T04:56:03+5:30

सावली : खेडी-गोंडपिंपरी मार्गावर ाजगड येथील काँग्रेसचे नेते संजय मारकवार यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या घटनास्थळावर गुरुवारी ...

Superintendent of Police inspected the spot | पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची केली पाहणी

पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची केली पाहणी

सावली : खेडी-गोंडपिंपरी मार्गावर ाजगड येथील काँग्रेसचे नेते संजय मारकवार यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या घटनास्थळावर गुरुवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी भेट देऊन जलद गतीने तपास करण्याचे आदेश दिले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तारे आणि सावलीचे ठाणेदार कुमारसिंग राठोड व ताफा उपस्थित होता. अपघात होऊन पाच दिवस लोटले. मात्र अजूनही अपघात की घातपात, यावरच तपास सुरु आहे. मारकवार यांच्या अंगावर असलेले सुमारे १५ तोळे सोने व पैशाचे पॉकीट नसल्यामुळे अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. परिसरातील काँग्रेसच्या नेत्यांनी कथीत अपघाताची सखोल चौकशी करुन योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध सावली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली आणि घटनेचा तपास करण्यासाठी एक स्वतंत्र चमु तयार करण्यात येईल, असे सांगितले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तारे करीत आहेत.

Web Title: Superintendent of Police inspected the spot