शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

संडे मार्केटचा तिढा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत दोन हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात, फुटपाथवर या फेरीवाल्यांनी आपले छोटेखानी दुकान थाटले आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरीवाले रस्त्यावर असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद पडतो.

ठळक मुद्देमार्केट अजूनही रस्त्यावरच : नागरिकांना अकारण त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील गांधी चौकापासून जयंत टॉकीज चौकापर्यंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्यावर दर रविवारी संडे बाजार भरतो. या बाजारात प्रचंड गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही बाब हेरून मनपाने हा बाजार इतरत्र हलविण्याच्या हालचाली केल्या. मात्र व्यावसायिकांना ते मान्य नाही. त्यामुळे हा तिढा आजही कायम आहे.दरम्यान, आज रविवारी महानगरपालिका प्रशासनाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत या जागेवर व्यावसायिकांना बसू दिले नाही. मात्र सायंकाळनंतर पुन्हा व्यावसायिकांना आपले मार्केट सुरू केले.चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीत दोन हजारांहून अधिक फेरीवाले आहेत. शहरातील रस्त्यांवर, चौकाचौकात, फुटपाथवर या फेरीवाल्यांनी आपले छोटेखानी दुकान थाटले आहे. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. फेरीवाले रस्त्यावर असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद पडतो. त्यामुळे फेरीवाल्यांसाठी शहरात काही ठिकाणी वेगळे झोन करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. या झोनमध्ये कार्यरत सर्व फेरीवाल्यांना स्वतंत्र ओळखपत्रही देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची नोंदणी करणे क्रमप्राप्त होते. त्या अनुषंगानेच महानगरपालिकेने फेरीवाला नोंदणीकरण अभियान सुरू केले होते. प्रारंभी फेरीवाल्यांनी याला प्रतिसाद न दिल्याने हे नोंदणीकरण पूर्ण होण्यास विलंब झाला. या सर्वेक्षणात फेरीवाल्यांचे आधारकार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक करणे आवश्यक आहे. मात्र वारंवर सांगूनही फेरीवाले आपला आधारकार्ड मोबाईल क्रमांकाला लिंक करीत नसल्याने अडचणी वाढल्या होत्या. उल्लेखनीय असे की २००९ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण निश्चित केले आहे. फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांच्यासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश सर्व महानगरपालिकांना देण्यात आले होते. मात्र तेव्हा या आदेशाची पाहिजे तशी अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही फेरीवाल्यांना ओळखपत्र मिळाले नाही.पर्यायी जागा व्यावसायिकांना मान्य नाहीअशातच मागील काही महिन्यांपासून गांधी चौकापासून जयंत टॉकीज चौकापर्यंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्त्यावर दर रविवारी संडे बाजार भरतो. कपडे, चप्पल-जोडे, ड्रेस मटेरियल यासारख्या अनेक वस्तूंची दुकाने या बाजारात असते. येथील वस्तूंचे दर दुकानाच्या तुलनेत कमी असल्याने नागरिक या बाजाराकडे आकर्षित होऊ लागले. त्यामुळे दिवसभर या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. रस्त्यावरच हा बाजार भरत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याचा इतर नागरिकांना प्रचंड त्रास होतो. याबाबत काही नागरिकांनी तक्रार केल्यानंतर मनपाने हा बाजार इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या. या संदर्भात व्यावसायिकांना मनपाने नोटीसही बजावल्या होत्या. मात्र मनपा बाजारासाठी जी जागा सूचवित आहे, ती जागा अडगळीत असल्याने व्यावसायिक त्या जागेवर जायला तयार नाही. त्यामुळे प्रश्न सुटला नाही.

टॅग्स :Marketबाजार