शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीला नमवत त्याने घेतली गरुडझेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

शाळेपासून दूर गेलेला तरुण मोठ्या पदावर : संघर्षातून मिळविले यश नीलेश झाडे गोंडपिपरी : घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे तो शाळेपासून ...

शाळेपासून दूर गेलेला तरुण मोठ्या पदावर : संघर्षातून मिळविले यश

नीलेश झाडे

गोंडपिपरी : घरच्या हलाकीच्या परिस्थितीमुळे तो शाळेपासून तब्बल पाच वर्षे दूर राहिला. कोवळ्या वयात त्याने शेतात नांगर चालविले, पण शिकल्याशिवाय मन स्वस्थ बसेना. म्हणून त्याने पुन्हा शाळेत पाय ठेवला. प्रामाणिक प्रयत्नाने त्याने गरुडझेप घेतली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवत तो समाजकल्याणचा निरीक्षक झाला. नुकत्याच झालेल्या एमपीएससीच्या सहायक प्रशासकीय अधिकारी पदाचा निकाल लागला. त्यात त्याने बाजी मारली. अल्पशा अपयशाने खचून जाणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे यश त्याने संपादित केले आहे.

प्रशांत खर्डीवार असे या तरुणाचे नाव असून, तो गोंडपिपरीचा भूमिपुत्र आहे. गोंडपिपरीच्या प्रशांत खर्डीवार या तरुणाने आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, परिस्थितीमुळे त्याला शाळा सोडावी लागली. आपल्या मूळगावच्या शेतीचा भार त्याने खांद्यावर घेतला. एवढ्या कमी वयात त्याने असा निर्णय का घेतला, या विचाराने कुटुंबीयांत चिंता पसरली. शेतात प्रचंड मेहनत घेत, प्रशांतने अनेक वर्षे यशस्वीपणे भार पेलला. काही वर्षांनी त्याच्यात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. सतरा नंबरचा फार्म भरून त्याने दहावीची परीक्षा दिली, पण पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषेच्या विषयात तो नापास झाला, पण त्याने हार मानली नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी अर्ज भरला. यावेळी त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. अकरावीत नियमितपणे प्रवेश घेतला. बारावीत महाविद्यालयातून पहिला येत त्याने कमाल केली. शिक्षक होण्याच स्वप्न बघत प्रशांतने डी.एडचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, जि.प. शिक्षकांची पदभरती होत नव्हती. अनेक वर्षे भरतीची वाट पाहून कंटाळलेल्या प्रशांतने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरविले. गावात राहून परीक्षेची तयारी पाहिजे त्या पद्धतीने होऊ शकत नाही, हे बघून त्याने पुणे गाठले. या काळात किशोर सुलाने यांनी त्याला मोठी मदत केली. अभ्यासाने झपाटलेल्या प्रशांतला सातत्याने केलेल्या प्रयत्नाचे फळ मिळाले अन् तो समाजकल्याण निरीक्षक झाला.

सध्या तो पुणे जिल्ह्यात कार्यरत आहे. परवा तब्बल तीन वर्षांनंतर एमपीएससीच्या सहायक प्रशासकीय अधिकारी पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लागला अन् प्रशांतने त्यातही बाजी मारत आपले अस्तित्व सिद्ध केले. तो लवकरच त्या पदावर रुजू होणार आहे. शिक्षणापासून कोसोदूर जात शेतात राबणाऱ्या प्रशांतने संघर्षाने केलेली कमाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.