शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर

By admin | Updated: June 13, 2014 00:01 IST

वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण आजही कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची आठ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत

वरोरा : वरोरा उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण आजही कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची आठ पदे मंजूर आहेत. मात्र सध्या तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून या तीनपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला अन्य रुग्णालयात प्रभारी म्हणून पाठविण्यात आल्याने सध्या उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा दोन वैद्यकीय अधिकारीच सांभाळत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाला वरोरा तालुक्यातील माढेळी, नागरी, कोसरसार, सावरी प्राथमिक आरोग्य केंद्र जोडण्यात आले असून वरोरा शहर तसेच वरोरा, माजरी व शेगाव पोलीस ठाण्यातील वैद्यकीय कामकाजही येथूनच केले जाते. उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थापनेपासून आजतागायत कधीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजूर असलेली पदे पूर्णपणे भरण्यात आली नाहीत. आजही तीच स्थिती कायम आहे. येथे कागदोपत्री सध्या तीन वैद्यकीय अधिकारी असून त्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला इतरत्र बोलाविण्यात आल्याने सध्या दोनच वैद्यकीय अधिकारी कार्यभार सांभाळत आहेत. सध्या बाह्यरुग्ण संख्या दर दिवशी ३०० च्या जवळपास आहे. त्यानंतर शवविच्छेदन, आरोपीची वैद्यकीय तपासणी, बाळंतपण, अपघात, शस्त्रक्रिया शिबिरे आदी कामकाजाचा मोठा ताण उपजिल्हा रुग्णालयावर आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अधिक कामाचा बोझा वाढत आहे. त्यामुळे रुग्णांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. वरोरा शहरातून नवी दिल्ली चेन्नई रेल्वे मार्ग व राज्य मार्ग असल्याने अनेकदा अपघात होत असतात. या अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात येते.वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे व सुविधांचा अभाव यामुळे रुग्णांना पुढील उपचाराकरिता चंद्रपूर, वर्धा नागपूर आदी ठिकाणी हलविण्यात येते. परिणामी रुग्णांना, त्यांच्या आप्तेष्टांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. रिक्त पदासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)