शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

एसएमएसद्वारे मिळणार विद्यार्थ्यांना निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच बंद झाले.

ठळक मुद्देसंभ्रम दूर : पुढील सत्राचा अभ्यास होणार सुलभ

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने निकाल कसा लागणार आणि पुढील वर्गात कसे जाणार, असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना पडला असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी पत्र काढून शैक्षणिक सत्र २०१९-२० चा निकाल पालकांच्या दूरध्वनीवर, एसएमएस व इतर ऑनलाईन पद्धतीने तत्काळ कळविण्याच्या सुचना केल्या आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात निकाल लागणार असून विद्यार्थ्यांचा पुढील वर्गात जाण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी १५ मार्चपासून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता प्रथम पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालयांसह सर्वच बंद झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा, महाविद्यालय सुरु होऊन परीक्षा होतील, अशी विद्यार्थ्यांची आशा असतानाच लॉकडाऊन तब्बल दोन वेळा वाढविण्यात आला. दरम्यान, शिक्षण विभागाने प्रथम पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्याने नववी आणि अकरावीचीही परीक्षा रद्द करण्यात आली. एवढेच नाही तर दहावीचा शेवटचा पेपरही रद्द करण्याची वेळ यावर्षी प्रथमच शिक्षण मंडळावर आली. परीक्षा झाली नसल्यामुळे पुढील वर्गात कसे जाणार तसेच लॉकडाऊन नंतर शाळा परीक्षा घेणार की, काय असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना मनात उपस्थित केले जात होते. दरम्यान, शिक्षण विभागाने शाळांना मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याचे आदेश दिल्यानंतर शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात गुंतले आहे. त्यानंतर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी एक पत्र काढून विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी आणि पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास उपलब्ध साहित्याच्या आधारे करणे सोपे व्हावे यासाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा निकाल दूरध्वनी, एसएमएस तसेच इतर आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना तत्काळ कळविण्याच्या सुचना केल्या आहे. या पत्रामुळे शिक्षकांना आता विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल कळविण्यासंदर्भात लवरच पाऊल उचलावे लागणार असून विद्यार्थी तसेच पालकांची चिंता दूर होणार आहे.मूल्यमापनाद्वारे मिळणार गुणकोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावावा यासाठी प्रथम शिक्षक संभ्रमात होते. यासाठी शिक्षण मंडळाने मुल्यमापनाद्वारे निकाल लावण्याच्या सूचना दिल्यानंतर शिक्षकांनी तशी तयारी सुरु केली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्र्षातील पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाचा निकाल तयार करण्यासाठी शैक्षणिक सत्र दोनचे मूल्यमापन करून गुण देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Educationशिक्षण