शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

युती शासनाकडून विद्यार्थ्यांची चेष्टा

By admin | Updated: April 24, 2015 00:53 IST

दुष्काळग्रस्त भागाला तत्परतेने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या युती शासनाने विद्यार्थ्यांचीही चेष्टा केली आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरदुष्काळग्रस्त भागाला तत्परतेने मदत देण्याची घोषणा करणाऱ्या युती शासनाने विद्यार्थ्यांचीही चेष्टा केली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याची शासनाने घोषणा केली खरी मात्र, अद्यापपर्यंत एक दमडीही विद्यार्थ्यांच्या हातात पडलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त घोषित झालेल्या ३९३ गावांतील दहावी व बारावीच्या २६७७ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ स्वरूपात १४ लाख ५८ हजार ८२५ रूपये शासनाकडून येणे आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा आहे. काही प्रमाणात मदत मिळाली असली तरी मिळणारी मदत ही तुटपुंजी ठरत आहे. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळणे गरजेचे आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही विद्यार्थ्याला परीक्षा फीची रक्कम परत मिळालेली नाही. नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर तब्बल १४ लाख ५८ हजार रूपये शासनाकडून येणे बाकी आहे. शासकीय मदत वाटप करताना वेळ खाऊपणा होत असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परीक्षा फी माफीचा निर्णय झाल्यानंतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली. परंतु, शासन अद्यापही फी परत करण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी चक्रव्यूहात अडकलेल्या नागरिकांना वेळेत मदत मिळाली तर त्या मदतीचा लाभ होईल. परंतु, उशिरा मदत देऊन मदतीतही चालढकलपणा करण्याचे धोरण सध्या शासनाकडून सुरु आहे. दहावी परीक्षेसाठी ३०० रूपये तर बारावीच्या परीक्षेसाठी कला अभ्यासक्रमाला ४३० आणि विज्ञान अभ्यासक्रमासाठी ४४५ रूपये परीक्षा शुल्क घेण्यात आले. याचे १४ लाख ५८ हजार रूपये येणे आहेत.