शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याने रचले स्वत:च्या अपहरणाचे नाट्य

By admin | Updated: March 16, 2015 00:40 IST

शाळेला बुट्टी मारून वेळ इतरत्र गमावणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकांनी आईवडिलांकडे तक्रार केली. आईवडिलांनी रागावल्याने स्वत:चे अपहरणाचे नाट्य घडवून आणले.

बाबूपेठ (चंद्रपूर) : शाळेला बुट्टी मारून वेळ इतरत्र गमावणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकांनी आईवडिलांकडे तक्रार केली. आईवडिलांनी रागावल्याने स्वत:चे अपहरणाचे नाट्य घडवून आणले. पोलिसात तक्रार झाल्यानंतर आपण स्वत:चे अपहरण केल्याची कबुली विद्यार्थ्यांना पोलिसाकडे दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने केलेल्या अपहरण नाट्यावर आता पडदा पडला आहे.मागील दोन दिवसांपासून चंद्रपुरात विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे प्रकरण चर्चेचा विषय बनले होते. शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले. दरम्यान शहर पोलिसांनी गंभीरतेने घेऊन यातील सत्यता उजेडात आणली आहे.गोपालपुरी वॉर्डातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने रागामध्ये रेल्वेस्थानकावर जाऊन थेट रायपूर गाठले. येथे गेल्यानंतर मात्र त्याची भंबेरी उडाली. आता कसे करायचे या विचाराने त्याने कुटुंबीयांना एका नागरिकाकडून फोन करून आपले अपहरण झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांकडे तक्रार असल्याने याबाबतची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रॅप करून त्याचा शोध घेतला असता तो नागपूर येथे आल्याचे पोलिसांना समजले. त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आपण स्वत:च पळून गेल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय भारती यांनी दिली. (वार्ताहर)