शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्ते निर्मितीने वंचित गावे विकासाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निधीतंर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले. बल्लारपूर शहरातील छटपुजा घाट निर्मितीमुळे सौंदर्यीकरण झाले. नागरिकांना सुविधा मिळाल्या. नगर परिषद ते कॉलरी काटा गेट मुख्य रस्त्याच्या सिमेंटीकरणाची समस्या दूर झाली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दळवळणाच्या साधनांमुळे गावांचा शहराशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोणत्याही गावाची व शहराची जिल्ह्याची ओळख जाणून घेण्यासाठी तेथील रस्त्यांचा विकास आणि पायाभूत सुविधांची स्थिती कशी आहे, हे निकष महत्त्वपूर्ण मानल्या जातात. केेंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मंजूर निधी, आदिवासी उपाययोजना, हायब्रिड अ‍ॅन्युटी, ३०५४ योजनेत्तर, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, जिल्हा वार्षिक योजना आदिवासी, खनिज विकास निधीतून बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा व जिल्ह्यात कोट्यवधींचे रस्ते तसेच पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे गावे विकासाच्या परिघात आली. दळवळणाच्या साधनांमुळे गतिमानता आल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निधीतंर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले. बल्लारपूर शहरातील छटपुजा घाट निर्मितीमुळे सौंदर्यीकरण झाले. नागरिकांना सुविधा मिळाल्या. नगर परिषद ते कॉलरी काटा गेट मुख्य रस्त्याच्या सिमेंटीकरणाची समस्या दूर झाली आहे. मूल येथे १० कोटींच्या बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नुतणीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आठवडी बाजाराचे बांधकामही लवकरच पूर्ण होणार आहे. चिरोली गावाजवळील अंधारी नदीवर पुल नसल्याने पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागत होता. यासाठी १ कोटी ११ लाखांचा निधी मंजूर झाला. पुलासह बंधाऱ्यांचे बांधकाम केल्या जाणार आहे. हायब्रीड अ‍ॅन्युटी तत्वावर मूल ते गोंडपिपरी रस्त्यांच्या सुधारणेसाठी १२४ कोटी ३२ लाख, मूल-पोडसा रस्त्यासाठी ११९ कोटी २८ लाखांची कामे झाली. जानाळा ते चिंतलधाबा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ५० कोटींचा निधी खर्च करण्यात आला. आक्सापूर-पोंभूर्णा-सुशी-जानाळा रस्ता सुधारणेसाठी २५ कोटी, डोंगरहळदी ते पोंभुर्णा फाटा रस्ता व डांबरीकरण २४ कोटी ६० लाख, जानाळा-पोंभुर्णा-चिंतलधाबा रस्ता मजबुतीकरणासाठी ३ कोटी, जानाळा- पोंभुर्णा-बोरगाव रस्त्यासाठी सिमेंट काँक्रीट बांधकाम ३ कोटी, नवेगाव मोरे ते भिमणी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांंबरीकरणासाठी ३ कोटी, आष्टा चक नवेगाव रस्त्याच्या सुधारणा ३ कोटी, सातारा तुकूम ते डोंगरहळदी रस्त्याकरिता २ कोटी ५० लाखांचा निधी खर्च करण्यात आला. यातील काही कामे कार्यान्वित तर बहुतांश पूर्ण झाली आहेत.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक कामे२५१५ या लेखाशिर्षअंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्र व जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागात सर्वाधिक कामे पूर्ण झाली आहेत. रस्ते, पूल वजा बंधाऱ्याचे बांधकाम, इमारतींचे बांधकाम व नगर विकास विभागाच्या कामांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, वनविभागाकडून रस्ते विकासाला गती देण्यात आली. पावसाळ्यात बेटांचे स्वरूप येणाºया काही गावांची समस्या कायमची दूर झाली.बल्लारपूर मतदार क्षेत्रातील शेकडो गावांतील रस्त्यांसाठी शासनाने मुबलक निधी दिला. या विकास कामांचे श्रेय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना द्यावे लागते. त्यांनी या कामांकडे विशेष लक्ष दिले.- अजित मंगळगिरीवार, पोंभुर्णाशेतीकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यांची समस्या दूर झाली आहे. शहराला जोडणारे उत्तम रस्ते निर्माण झाल्याने गावांचा दररोजचा संपर्क वाढला. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख दृष्टीचा हा परिणाम आहे.- मंगेश पोटवार, मूलजुन्या रस्त्यांचा बदलला चेहरामोहराबल्लारपूर विधानसभा क्षेत्रातीन बल्लारपूर, मूल व पोंभुर्णा तालुक्यातील काही मोठ्या गावांना जोडणाºया रस्त्यांची दूरवस्था झाली होती. वाढत्या वर्दळीमुळे बरेच रस्ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत होते. अशा जुन्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून रूंदीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. शासनाने या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. परिणामी, मागील १० वर्षांत शेकडो जुन्या रस्त्यांचा चेहरामोहरा बदला. सामाजिक कल्याणाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी या पायाभूत सुविधा उपयुक्त ठरल्या आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक