शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गाची दैना

By admin | Updated: October 12, 2015 01:34 IST

राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

खड्ड्यांमुळे अपघातात वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षदेवाडा : राजुरा तालुक्यातील राजुरा, देवाडा, सुमठाणा, सोन्डो लक्कडकोट या राज्यमार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरुन जाताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा भास होतो. या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात दिवसागणिक वाढच होत आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते फार खराब झालेले आहे. या भागातील बहुतांश जनता तेलगु भाषिक आहेत. त्यांचा संपर्क तेलंगणा प्रदेशाची जास्त असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील अनेक गावे येतात. या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे पादचारी, दुचाकी, चारचाकीधारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासन जनतेच्या मुलभूत सोयी सुविधाकडे विशेष लक्ष देत असल्याचा दावा करीत आहे. त्यात रस्त्याच्या विकासाला प्राधान्य आहे. या कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपये रस्ते बांधकाम व डागडुजीवर खर्च करूनही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची अवस्था बिकटच आहे. कितीही पैसा ओतला तरी या रस्त्यावरचे खड्डे काही केल्या बुजत नाही. उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. राजुरा रेल्वे गेट ते सुमठाणा तुलाना वरुर रोड, सोन्डो, सिद्धेश्वर, आनंदगुडा, जंगुगुडा, पारधीगुडा, लक्कडकोट रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. रस्ते बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे हा पैसा कुठे जिरतो. हे कळायला मार्ग नाही. डांबराचे प्रमाण कमी असते. डांबर पातळ करण्यासाठी एलडीओ नावाचा पदार्थ मिसळावा लागतो. मात्र ते महागडे असल्याने डांबरात केरोसिन वापरले जाते. केरोसिन वापरणे हे नियमबाह्य आहे. केरोसिनमुळे डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट होतो. पण त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम विभागाचे अभियंते अशा रस्त्यांना सर्रास मंजुरी देतात. त्यामुळे तीन ते चार महिण्यात रस्ते उखडतात. या प्रकारात सर्वांचे हित असल्याने रस्ता कधी उखडेल याचीच सारेजण वाट बघत असतात. यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचे निरीक्षणच योग्यरित्या होत नाही. मात्र याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकांना दहा टनांची मर्यादा देण्यात आली. पण कमी वेळात जास्त वाहतूक करण्याच्या लालसेपोटीएका ट्रकमध्ये १५ ते १८ टन माल भरतात. त्यामुळे रस्त्याचे बेहाल झाले आहेत. (वार्ताहर)