शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी २ ...

चंद्रपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने तयार केलेले तीन कृषी कायदे जुलमी असल्याचा आरोप करून रद्द करण्याची मागणीही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे निवेदनातून केली आहे.

राजधानी दिल्लीच्या सीमेवरील दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने चर्चेच्या नऊ फेऱ्यांमध्ये तीन कृषी कायद्यांबाबत कोणतीही तडजोड केली. शेतकरी समस्या सोडविण्यासाठी समाधानकारक ठोस भूमिका घेतली नाही. समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी संपूर्ण समाज घटकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून एकजुटीचे दर्शन घडविणे गरजेचे होते. त्यामुळे अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार शेतकरीबांधवांप्रति बांधिलकी दर्शविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस रमेश पिंपळशेंडे व अध्यक्ष दीपक जेऊरकर यांनी केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे आणि देशातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबत विचार मांडलेे.

कर्मचारी कृषी कायद्याविरुद्ध एकवटले

महसूल, बांधकाम, पाटबंधारे, कोषागार कार्यालय, वन विभाग, वस्तू व सेवा कर , भूमिअभिलेख, कृषी, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कर्मचारी, अभियांत्रिकी महाविद्यालय, भूविज्ञान-खनिकर्म, हिवताप कर्मचारी, आरोग्य विभाग आदी विभागाचे कर्मचारी तसेच राजू धांडे, राजेश पिंपळकर, एस. आर. माणूसमारे, गणेश मानकर, महेश पानसे, अतुल भिसे, शैलेंद्र धात्रक, चंद्रकांत कोतपल्लीवार, राजेश पचारे, रवींद्र आमवार, अजय चहारे, श्रीकांत येवले, नितीन पाटील, अनंत गहुकर, अविनाश बोरगमवार, प्रीतम शुक्ला, संदीप गणफाडे आदींसह विविध कार्यालयीन संघटनांनी आंदोलनात सहभाग दर्शविला होता.