शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

ग्रंथदिंडीने विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 01:09 IST

मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला.

साहित्य रसिकांची गर्दी : विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभागचंद्रपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरतर्फे स्थानिक पोलीस फूटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला शुक्रवारी ग्रंथदिंडीने प्रारंभ झाला. दुपारी २ वाजता आझाद बगीचा येथून ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. यावेळी सिनेनिर्माता तथा दिग्दर्शक, लेखक शंतनू रोडे, कार्याध्यक्ष वामन तेलंग, संमेलन निमंत्रक प्रकाश एदलाबादकर, स्वागताध्यक्ष प्रा. विजय बदखल, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, आदी उपस्थित होते. गं्रथदिंडीत चंद्रपूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यात विद्यार्थिनींचा लेझीम पथक आकर्षण ठरला. वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा विविध घोषणा देत ग्रंथदिंडीत सहभागी विद्यार्थी समोर जात होते. विद्यार्थिनींनी महाराष्ट्रीय पोशाख परिधान करून विविध वेशभूषा साकारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रीयन संस्कृतिचे दर्शन ग्रंथदिंडीच्या माध्यामातून घडले. जटपुरा गेटवर ग्रंथदिंडीवर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. ही ग्रंथदिंडी जटपुरा गेट वरून रामनगर चौक मार्गे पोलीस फुटबॉल मैदान स्व. शरद जोशी साहित्यनगरी येथे पोहोचली. येथे ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)साहित्य रसिकांसाठी आज भरगच्च कार्यक्रम३० जानेवारीला सकाळी १० वाजता ‘शेतकरी, संवेदनाहीन समाज आणि शासकीय धोरण’ या विषयावर अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होईल. यात श्रीनिवास खांदेवाले, गजानन अहमदाबादकर, कृष्णा घड्याळपाटील यांचा सहभाग राहणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता कथाकथन डॉ. दिलीप अलोणे यांच्या अध्यक्षतेत होईल. त्यानंतर ‘स्त्रीवादी साहित्य दिशाहीन झाले आहे’ या विषयावर दुपारी २.३० वाजता परिसंवाद होणार आहे. ‘झाडीपट्टीतील लोककला, लोकनाट्य आणि रंगभूमी : वर्तमान वास्तव’ या विषयावर डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेत सायंकाळी ५ वाजता परिसंवाद होणार असून यात डॉ. श्रीकांत नाकाडे, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, ग.रा. वडपल्लीवार, प्रा. धनराज खानोरकर यांचा सहभाग राहणार आहे.