शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे खाण बंद आंदोलन प्रारंभ

By admin | Updated: May 14, 2017 00:30 IST

स्थानिक माजरी येथील नागलोन ओ.सी.-२ कोळसा खाण शनिवारपासून बंद पाडण्यात आली आहे.

माजरी वेकोलि : १५ हजार टन कोळशाचे उत्पादन ठप्पराजेश रेवते । लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : स्थानिक माजरी येथील नागलोन ओ.सी.-२ कोळसा खाण शनिवारपासून बंद पाडण्यात आली आहे. नागलोन, पळसगाव, माजरी, पाटाळा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकुटुंब आंदोलनात उतरले आहेत. जोपर्यंत नोकरीचे आदेश देण्यात येणार नाही, तोपर्यंत खाण सुरू होणार नाही, असा इशारा दिला आहे.जून-२०१५ मध्ये वेकोलिने माजरी, पळसगाव, नागलोन व पाटाळा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नागलोन ओ.सी.-२ येथे कोळसा उत्पादन सुरू केले. दोन वर्षे होऊनही आतापर्यंत नोकरी न दिल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महिला व लहान मुलांसह तिसऱ्यांदा ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. यापूर्वी १ ते १० मार्चपर्यंत १० दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी १०२ प्रकल्पग्रस्तांपैकी २८ जणांना नोकरीत समावून घेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात बैठक घेवून उर्वरित ७८ प्रकल्पग्रस्तांना ३० एप्रिलपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु आज १३ दिवस उलटले तरी त्यांना नोकरी मिळाली नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा ५ मे रोजी चंद्रपूर येथे बैठक बोलावून वेकोलि अधिकाऱ्यांना फटकारले. परंतु वेकोली अधिकारी जिल्हाधिकारीच्या आदेशालासुद्धा मानायला तयार नाही. म्हणून प्रकल्पग्रस्तांना न्यायासाठी शनिवारपासून पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनामुळे वेकोलिचे १५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातून ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या आंदोलनात लिलेश ढवस, रवींद्र ढवस, संदीप झाडे, गजानन पारशिवे, रामू डोंगे, अनिल ताजने, गोकुल डोंगे, अविनाश ढवस, वासुदेव डंभारे, देविदास मशारकर, गिता ढवस, माया ढवस, विमल डोंगे, कलावती डंभारे, रंजीता झाडे, मंगला निमकर, कल्पना ढवस, शशीकला झाडे, सुनिता ढोक, मनिषा डोंगे, मीरा ढवस आंदोलनात सहभागी आहेत.काम बंदमुळे परिणामप्रकल्पग्रस्तांचे काम बंद आंदोलनामुळे पावसाळ्यापूर्वीच काम ठप्प झाले आहे. कोराडी नाला हा डायर्व्हशन केला आहे. परंतु ते काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात जवळच्या गावात पुरामुळे गावात पाणी शिरू शकते, अशी शक्यता आहे. तसेच काम बंद आंदोलनामुळे कोळशाच्या साठ्याला आग लागू शकते. त्यातून चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा पुरवठा होणार नाही.एक महिन्याचा वेळ हवावेकोलि माजरीचे महाप्रबंधक एम. येलय्या यांनी प्रकल्पग्रस्तांना पत्र देवून काम बंद न पाडण्याचे आवाहन केले आहे. एक महिन्याचा वेळ द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. परंतू प्रकल्पग्रस्त शेतकरी आता कोणत्याही प्रकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही. नोकरीचे आदेश मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहील, असे मत व्यक्त केले.