भिसीतील लोकमत रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST2021-07-12T04:18:03+5:302021-07-12T04:18:03+5:30

भिसी : येथील श्री विठ्ठल- रुख्माई देवस्थानातील सभागृहात शनिवारी लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व ...

Spontaneous response to Lokmat Raktadan Mahayagya in Bhisi | भिसीतील लोकमत रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भिसीतील लोकमत रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भिसी : येथील श्री विठ्ठल- रुख्माई देवस्थानातील सभागृहात शनिवारी लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व धनराज मुंगले मित्र परिवाराच्या वतीने ‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल - रुख्माई देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गरिबा निमजे, प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल - रुख्माई देवस्थान कमिटी सदस्य विना अहेर, भिसी प्रा. स्वास्थ्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कष्टी, ज्येष्ठ नागरिक कवडू मुंगले, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूराव बोम्मेवार, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे चंद्रपूर जिल्हा सचिव ईश्वर डुकरे, लोकमत प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिरभय्ये, आनंद भिमटे, हरीश कामडी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजू मुंगले, दिलीप टापरे, प्रशांत गभणे, सारंग भिमटे, कोषाध्यक्ष दीपक आडकिने, रवींद्र गोंगले, प्रा. आ. केंद्र भिसीचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बॉक्स

यांनी केले रक्तदान

गजानन रघुनाथ मुंगले, विलास काशिनाथ मुंगले, पप्पू पठाण, नीलेश देहारे, दीपक मेश्राम, सुरेंद्र मुंगले, भारत वंजारी, अमोल मेश्राम, रोशन खोब्रागडे, प्रमोद बेदाडे, वैभव जांभुळे, प्रशांत गभणे, दिलीप टापरे, राजू मुंगले.

Web Title: Spontaneous response to Lokmat Raktadan Mahayagya in Bhisi