शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढण्याची साखळी सोडण्यासाठी लॉकडाऊन ही उपाय योजना आहे.

ठळक मुद्देफेरफटका महानगराचा : पोलीस ताफा अत्यल्प असतानाही चंद्रपूरकरांनी पाळला लॉकडाऊनचा पहिला दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर शहराला लॉकडाऊन केले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकही आता सतर्क झाले असून स्वंयस्फुर्तीने लॉकडाऊनला सहकार्य करीत असल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे, बहुतांश नागरिकांनी गुरुवारीच खरेदी करून शुक्रवारपासून घराबाहेर पडणे टाळल्याचे शहरात फेरफटका मारल्यानंतर बघायला मिळाले.जिल्ह्यात २२८ कोरोना बाधितांपैकी ६० जण चंद्रपूर शहरातील आहेत. अधिक संक्रमण होऊ नये, संक्रमित असणाऱ्या रुग्णांचा शोध घेता यावा, यासाठी शहरापूरते लॉकडाऊन करण्यात आले आहे. सुरुवातीला शहरात एकही रुग्ण नव्हता. गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्ण संख्या वाढण्याची साखळी सोडण्यासाठी लॉकडाऊन ही उपाय योजना आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किंवा कोरोना आजाराचे लक्षणे जाण्यासाठी ७ ते १० दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळेच हा दहा दिवसांचा टाळेबंदीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यास पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.पुढील दहा दिवस महानगरपालिकेकडून संसर्ग थांबविण्यासाठी तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी डीप क्लिंनिंग मोहीम शहराच्या विविध भागात राबविण्यात आली. आठ प्रतिबंधित क्षेत्रात सातत्याने निजंर्तुकीकरण करण्यात येऊन असून फॉगिंग, फवारणी मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांद्वारे केली जात आहे.या घडामोडीं्वर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी लक्ष ठेऊन आहेत. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे यांच्या नियंत्रणात मनपाचे चारही सहायक आयुक्त धंनजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, विद्या पाटील यांनी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथकासह गुरुवारी पाहणी केली. जटपुरा गेट, वरोरा नाका, नागपूर मार्ग आदी परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ते प्रत्येक वाहनांची तपासणी करीत होते. पेट्रोलपंपवर एकही वाहन येत नव्हते. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या