शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडीवर लवकरच होणार उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2015 01:54 IST

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सोमवारी

चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी सोमवारी सायंकाळी झालेल्या समितीच्या बैठकीत तात्पुरती उपाययोजना करण्याचा निर्णय झाला. त्या नुसार येत्या असाठवडा भरात या निर्णयाचीे अंमलबजावणी होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला महापौर राखी कंचलार्वार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासह पालकमंत्र्यांनी नेमलेल्या समितीमधील सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत वाहतुक व्यवस्था निट करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना लवकरच अंमलात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले.शनिवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार या बैठकीत अनेक पयार्यावर चर्चा करण्यात आली. दीर्घकालीन उपाययोजना व तात्पुरत्या उपाययोजना यावर विस्ताराने चर्चा करण्यात आली. गांधी चौकातून येणारी वाहतूक चांडक मेडिकल चौक समोरून वळविण्याबाबत चर्चा झाली. दुचाकी वाहतूक चांडक मेडिकल समोरून वळवावी व चार चाकी वाहतूक जटपुरा गेट मधून सोडावी अथवा महात्मा गांधी मार्गावर लेन आखून दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आणि सिग्नल उभारण्याचा प्रस्ताव या बैठकीत मान्य करण्यात आला. जटपुरा गेटसमोर वाहतूक सिग्नल देऊन दुचाकी व चार चाकी वाहतूक नियंत्रीत करण्यात येणार आहे. या संबंधिची पाहणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक एक दोन दिवसात करणार आहेत. कायमस्वरूपी उपाययोजनेमध्ये जटपुरा गेटला येऊन मिळणारे रस्ते विकास आराखडयाप्रमाणे मोठे करण्यासाठी मोहीम राबविणे, पयार्यी पार्कीग व्यवस्था करणे, भुमिगत विद्युत व्यवस्था, परकोटालगतचे अतिक्रमण हटविणे, समांतर वाहतूक व्यवस्था, फुटपाथ मोकळे करणे आदी बाबीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पुरातत्व विभागाचे अधिकारी भेटीवर येतील तेव्हा त्यांच्या निदर्शनास या बाबी आणून देण्याचे ठरले. जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक सूचना मांडण्यात आल्या. या सुचनांचा विचार करुन निटनेटका वाहतुक आराखडा तयार करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. भविष्यातील नियोजन या आराखडयात असावे असा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)