क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅकचे लवकरच निर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:32+5:30

विभागीय व जिल्हा संकुल बांधकाम अनुदान सन २०१९ मध्ये हा १२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांना ९ मार्च २०१९ रोजीच्या पत्रान्वये निधी वितरित केल्याचे कळविले आहे.

Soon the creation of synthetic tracks in sports complexes | क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅकचे लवकरच निर्माण

क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅकचे लवकरच निर्माण

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकाराने मिळाले १२ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील सिंथेटिक ट्रॅक व अनुषांगिक कामांचे भूमिपूजन २५ जानेवारी रोजी होत आहे.
माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सिंथेटिक ट्रॅक व अनुषांगिक कामांसाठी १२ कोटी रू. निधी मंजूर करविला आहे व हा निधी वितरितसुध्दा झालेला आहे.
विभागीय व जिल्हा संकुल बांधकाम अनुदान सन २०१९ मध्ये हा १२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांना ९ मार्च २०१९ रोजीच्या पत्रान्वये निधी वितरित केल्याचे कळविले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर सदर निधीच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे सिंथेटिक ट्रॅक व अनुषांगिक कामांना सुरूवात होणार आहे. या कामाचे रितसर भूमिपूजन शनिवारी होऊ घातले आहे.
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी मंजूर करविला असून सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रात एवढ्या मोठया प्रमाणावर निधी मंजूर होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.
त्यांच्या पुढाकाराने सदर सिंथेटिक ट्रॅक व संबंधित विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब असून जिल्हाभरातील खेळाडूंनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. लवकरच खेळाडूंना या ट्रॅकवर सराव करता येणार आहे.

Web Title: Soon the creation of synthetic tracks in sports complexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.