शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगाऱ्याने केला शेतकऱ्यांचा घात

By admin | Updated: October 9, 2015 01:42 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलवून ...

पिकांना फटका : वेकोलिने नैसर्गिक नालावळवून माती टाकली किनाऱ्यावरप्रकाश काळे गोवरीवेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी, पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह बदलवून मानवनिर्मित नाले तयार केल्याने व निघालेली माती नाल्यांच्या किनाऱ्यावर टाकल्याने थोड्याफार पावसाने पाणी सरळ शेतात जाते. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने वेकोलिने केलेल्या प्रतापाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, धोपटाळा, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात दगडी कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे आहेत. या परिसरात कोळसा खाणींचे मोठ्या प्रमाणात जाळे असल्याने वेकोलिने अनेक नैसर्गिक जिवंत नाल्यांचे प्रवाह बदलले. कोळसा उत्खनानंतर निघालेले मातीचे महाकाय ढिगारे नाल्यांच्या किनाऱ्यावर टाकल्याने पावसाळ्यातील अल्पश: पावसाने पाणी शेतात शिरते. पोवनी ओपनकास्टने स्वत:च्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह बदलला. परिणामी मागील महिन्यात आलेल्या पावसाने दीड-दोनशे एकरातील शेती पाण्याखाली आली होती. पुराचे पाणी दोन-तीन दिवस शेतात साचून राहिल्याने हाती आलेले पीक पूर्णत: खराब झाले आहे. पिकांवर मातीचा थर बसल्याने पिकांना पाहिजे, त्या प्रमाणात टवटविपणा राहिला नसल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतीवर अतोनात खर्च केल्यानंतरही वेकोलिच्या दुष्परिणामामुळे हाती आलेले पीक नष्ट होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पुराच्या पाण्यामुळे खराब झालेले पीक दाखविले. मात्र वेकोलि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही.शेतकऱ्यांची मन समजावणी करीत शेतीची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून वेळ मारुन नेली. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना वेकोलिने कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही.वेकोलिने स्वत:च्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना जराही विचार न करता मानवनिर्मित नाले व मातीचे ढिगारे निर्माण केल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र यावर वेकोलिचे जबाबदार अधिकारी बोलायला तयार नाहीत.