शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील चंद्रपूरसह नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, सावली, वरोरा, राजुरा, भद्रावती, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गोंडपिपरी, मूल, बल्लारपूर या सर्वच तालुक्यासह गडचांदूर, घुग्घुस, कोठारी, विसापूर, चंदनखेडा, नवरगाव, नेरी, शेगाव या मोठ्या गावांमध्ये स्वयंस्फूर्त जनता कर्फ्य १०० टक्के यशस्वी केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे, कामगार, शेतकरी, मजूरांसह अन्य सर्वच घटकांतील लोकांनी घरीच राहणे पसंत केले.

ठळक मुद्देगजबजलेले चौक होेते शांत : घंटानाद करून वाढविले प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना व्हायरस पासुन होणाऱ्या प्रदुभार्वामुळे जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहर, गावे, वस्त्या, वाडे अक्षरश: निर्मनुष्य झाल्याचे चित्र रविवारी बघायला मिळाले. नागरिकांनी स्वयंफूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला.जिल्ह्यातील चंद्रपूरसह नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, सिंदेवाही, सावली, वरोरा, राजुरा, भद्रावती, जिवती, कोरपना, पोंभूर्णा, गोंडपिपरी, मूल, बल्लारपूर या सर्वच तालुक्यासह गडचांदूर, घुग्घुस, कोठारी, विसापूर, चंदनखेडा, नवरगाव, नेरी, शेगाव या मोठ्या गावांमध्ये स्वयंस्फूर्त जनता कर्फ्य १०० टक्के यशस्वी केला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे, कामगार, शेतकरी, मजूरांसह अन्य सर्वच घटकांतील लोकांनी घरीच राहणे पसंत केले. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असतानाच देशावरील आलेल्या संकटावर प्रथम मात करण्यासाठी जनतेनी एकजुट दाखविली. चंद्रपूरसह इतर शहरातील पानठेले, चहाटपरींसह इतर प्रतिष्ठानेही यापूर्वीच बंद केली होते. त्यामुळे केवळ शुकशुकाटच होता. आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या कुटुंबासह घरी थांबून जुने फोटो अल्बम बघितले. असेच काहीचे चित्र प्रत्येक घरात होते.चंंद्रपूर जिल्ह्यातील परसोडा (कोरपना) महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर दोन्ही बाजूतील वाहतूत बंद करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूर- आदीलाबाद या अत्यंत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरही शुकशुकाट बघायला मिळाला. एरवी सेकंदा सेकंदाला धावणारी भरधाव वाहनाची चाके थांबली होती. महामार्ग निर्मनुष्य होते. शनिवारी रात्री दहा वाजतापासून खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारने सीमा सील केल्या. सीमेवरून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड पासून ते ओरिसा राज्यापर्यंत माल वाहतूक केली जाते. यामुळे दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. कोरपना तालुक्यातील सिमेंट, कोळसा खाण आदी उद्योगाची मालवाहतूक पूर्णत: ठप्प पडली होती. दरम्यान, दोन्ही राज्य सरकारने दोन्ही बाजूने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सायंकाळी गावागावात घंटानाद करून अत्यावश्यक सेवेसाठी जे झटत आहे. त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी घंटानाद करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यामध्ये मात्र महिलांचा विशेष सहभाग दिसून आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही नागरिकांनी घंटानाद केला. तर जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कुनाल खेमनार, सीईओ राहूल कर्डिले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेत टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले.सेवानिवृत्तांचीही घेणार शासन मदतजिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत शासकीय, महापालिका, नगरपालिका, आर्म फोर्सेस (मेडिकल कॉर्प) मधून सेवानिवृत्त झालेले. परंतु, आरोग्य सेवा देण्यास सक्षम असणाºया डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचाºयांना उपलब्ध करून घेण्याबाबत आॅनलाइन अर्जाद्वारे इच्छुकता मागविता येणार आहे.रुग्णांच्या नातेवाईकांची फजितीरविवारी सकाळपासूनच सर्वत्र बंद पाळण्यात आल्यामुळे शुकशुकाट होता. दरम्यान, चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर तसेच मेडिकल कॉलेज परिसरातील संपूर्ण रेस्टारंट आणि हॉटेल बंद असल्यामुळे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांची चांगलीच पंचाईत झाली. रात्री ९ नंतर काही हॉटेल उघडेल, या आशेवर असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची निराशा झाली. सामान्य रुग्णालयातून केवळ रुग्णांसाठी जेवण मिळाले. मात्र त्यांच्यासोबत असलेल्यांचा रविवारी सकाळपासूनच उपासमार झाली. रात्री रुग्णालयाबाहेर अनेक बाहेरगावातील रुग्णांचे नातेवाईक कुठूनतरी खायला काही मिळेल यासाठी धडपड करत होते. बोटावर मोजण्याइतक्याच रुग्णांना ओळखीच्या नागरिकांकडून जेवण मिळाले.